- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर…
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष जोमात ; पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे,
- प्रशासकीय राजवटीतील एफएसआयचे घोटाळे चव्हाट्यावर,
- रेखा चवरे यांच्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन,
- मुंबई – गोवा महामार्ग, लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही…
- सूर्या प्रकल्पग्रस्ताना दिलासा, नवीन सातबारे मिळणार,
- ” अल निनो, ” च्या संकटाची चाहूल…
- सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक ; सर्वोच्च न्यायालय सर्व बाजूने तपास करणार,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय, काल एका बातमीने राज्यातील जनतेचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. पुणे जिल्ह्यातील मुंढवा जमीन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी या जमीन घोटाळ्यात कंपनीचे संचालक म्हणून पार्थ पवार यांचे नांव समोर आले असताना त्यांना आरोपी का केले नाही ? ते प्रभावशाली नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांचे नांव वगळले का ? असा प्रश्न विचारत पोलीस महासंचालकांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणी येत्या २८ सप्टें. रोजी पुढील सुनावणी आहे. पुणे मुंढवा सर्व्हे क्र. ८८ येथे सुमारे ४२ एकर जमीन आहे. ही जमीन महार…
दीपक मोहिते, राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे, एकेकाळी राजकारणातला ” पप्पू,” म्हणून ज्या राहुल गांधी यांना भाजपच्या आयटी सेलने सतत हिणवले, त्या भाजपला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधी संसदेत व बाहेर भारी पडले आहेत. संसदेत राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्या तोफखान्याला तोंड देताना भाजप हतबल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणप्रकरणी हे दोघे बहीणभाऊ संसदेत आपली कोंडी करतील, अशा भितीतून मोदी व शहा जोडगोळीने संसदेत उपस्थित राहणे टाळले. संसदेच्या इतिहासात आजवर असे कधीच घडले नव्हते. तरीही या प्रकरणी मोदी सरकारला माघार घ्यावी…
दीपक मोहिते, गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट, गेल्या चाळीस दिवसापासून राज्यातील पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी फेब्रु. महिन्यापासून राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. हवामान विभाग व हवामान विषयक तज्ञ या सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत पावसाने वाकुल्या दाखवल्या आहेत. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी भराभर शेतीची कामे उरकली, पण आगामी काळातील रब्बी हंगामाचे काय ? याविषयी सरकारी पातळीवर कोणीही बोलायला तयार नाही. ग्रामीण भागातील शेतीला पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारचे दिशाहीन धोरण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे ठरले आहे. डोंगरमाथ्यावरुन प्रचंड प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवणे, लहान धरणे विकसित करणे, नवीन धरणे उभारणे…
दीपक मोहिते, सारासार विचार करण्याची गरज आहे… *वसई तालुका व मिरा – भाईंदर हे दोन्ही परिसर दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत आहेत. मराठी – इतर भाषिक, मराठी – जैन व आता हिंदू – इतर असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात राहायचे असल्यास मराठी भाषा बोलता आली पाहिजे, पर्युषण काळात मांस – मासे विक्रीला बंदी, मुलांच्या डब्यातील खाद्यपदार्थात लसूण व कांदा असू नये, यावरून मिरा – भाईंदर परिसर सध्या चांगलाच गाजू लागला आहे. तर दुसरीकडे वसई तालुक्यात गणेश चतुर्थी सणाच्या तयारीसाठी महानगरपालिका प्रशासनाने बिगर हिंदूंना कामाचे ठेके देण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र भाजपच्या एका नगरसेवकाने दिले आहे. या सर्व घडामोडीमुळे हे…
दीपक मोहिते, समाजात इतकी असंवेदनशीलता येते तरी कुठून ? देशाच्या राजधानीत जे काही घडलं ते माणुसकीला काळे फासणारे होते. तसेच ते समाजाला सुन्न करणारे देखील आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेली जवळपास दोन दशके वास्तव्यास असलेला प्रख्यात मणिपुरी गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांस आठ-दहा जणांनी ठेचून मारले. विक्रम सिंह यांचे वय ५४, शरीरानेही तसे ते कृशच. त्यांचे पाप इतकेच की मध्यरात्रीच्या सुमारास घराखाली गोंगाट करणार्या रिकामटेकड्याना ते ” शांत बसा, ” असे सांगायला गेले. अलीकडे एका मोठ्या बिनडोक बहुल समाजास वाद्यांचा, फटाक्यांचा, ते काही नसेल तर गाठ्या-फाफडा खात इतरांचे डोके उठवणारा गोंगाट करणे, हे पौरुषत्वाचे लक्षण वाटू लागले आहे. या अशा…
दीपक मोहिते, ‘अमृत-सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना, कचरा म्हणजे केवळ विल्हेवाट लावण्याची समस्या नसून, त्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर केल्यास तो उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो. याच संकल्पनेला उद्योजकतेची जोड देत ‘अमृत-सक्षम,’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून मूल्यनिर्मिती करून नियमित उत्पन्नाचा स्रोत आणि शाश्वत व्यवसाय उभारता येतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूप तयार करणे, प्लास्टिक, कागद आणि काचेचे पुनर्वापरासाठी संकलन व प्रक्रिया करणे तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ (आरआरआर ) सुरू करणे, अशा विविध व्यवसायांच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. संकल्पनेपासून…
दीपक मोहिते, चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात महा रास्ता रोको, हजारो महिला रस्त्यावर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प, आज १० सप्टें.२०२६ रोजी सकाळी चारोटी नाका, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो आदिवासी आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार पट्ट्यातील महिला पारंपारिक साड्यांमध्ये रस्त्यावरच ठिय्या मारून बसल्या होत्या. हातात सिपीएमचे लाल झेंडे, ‘स्मार्ट मीटर हटाओ,’च्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. चारोटी नाका येथे अंदाजे ८ ते १० हजार लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यामध्ये ७०% महिला होत्या.पावसाळी ढगाळ वातावरण असताना लोक…
दीपक मोहिते, अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने आज कुख्यात गँगस्टर अबू सालेमची तातडीने सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०२६ मध्ये त्याची याचिका ” अकाली आणि गैरसमजुतीची,” म्हणून फेटाळली होती, तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला आहे. अबू सालेमने दावा केला होता की भारत-पोर्तुगाल प्रत्यार्पण करारानुसार त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही आणि त्याने ती शिक्षा पूर्ण केली आहे. त्याने चांगल्या वर्तणुकीसाठी मिळालेली ३ वर्ष २ महिन्यांची सूट ( रीमिशन ) आणि विचाराधीन कैदी…
दीपक मोहिते, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ( एनएच – ४८ ) हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा सर्वात महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हा महामार्ग वाहतूककोंडीमुळे सतत चर्चेत आहे. येथे होत असलेल्या वाहतूककोंडीवर लिहून लिहून माध्यमे थकली पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र झोपेतून जागे होऊ शकले नाहीत. सर्वात जास्त त्रास वसई-विरार, पालघर, काजूपाडा ते बापाणे फाटा, वर्सोवा ब्रिज, मिरा-भाईंदर पट्ट्यात होत असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच महामार्गावरून येजा करत असतात. पण त्यांनाही प्रवाशांचे दुःख कधी कळू शकले नाही.एकदा वाहतूककोंडी झाली की १० कि.मी.पर्यंत रांगा लागतात. ५ दिवस सलग जाम राहिल्याच्या घटनाही यापूर्वी…
जव्हार प्रतिनिधी, जांभूळविहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत रायतळे हद्दीतील हिल टॉप रेसिडेन्सी, जांभूळविहीर पूर्व येथे निवासी परिसरात सुरू असलेल्या भंगार व्यवसायामुळे नागरिकांना सध्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भंगार साठवणूक, कचऱ्याचे ढिगारे, मोठ्या आवाजातील मशिनरी तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित भंगार दुकान व कचरा साठा तातडीने हटवण्याची मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नबी रसूल सय्यद हे या परिसरात सन २०१२-१३ पासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत असून परिसरातील मोकळ्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात भंगाराची साठवणूक केली जाते. त्यामुळे निवासी वसाहतीतील मोकळ्या जागा तसेच रस्त्यांच्या परिसरात पत्र्याचे तुकडे, लोखंडी तारा, काचेचे…
