दीपक मोहिते,
” साहित्य संपदा, ”
रेखा चवरे यांच्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन,
प्रसिद्ध लेखिका रेखा चवरे यांच्या
‘ ये हृदयी चे ते हृदयी, ‘
या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कथन केलेल्या गाण्यांच्या सर्जनशील आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ समूहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे झाले.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेल्या
लतादीदी आशाताई आणि मी या सांगीतिक कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, भारतीताई मंगेशकर, प्रतापराव पवार ,अमोल पालेकर ,सुरेश वाडकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
सदर पुस्तक म्हणजे कला निर्मितीच्या स्मृतींचा एक अपूर्व ठेवा आणि निर्मितीची दृष्टी देणारा बहुमोल खजिना आहे .सुमारे ६० वर्षांपूर्वीच्या काळापासूनच्या संगीताचा हा इतिहास आहे. पंडितजींचे संगीताबद्दलचे विचार आणि सूक्ष्म चिंतन यात मांडण्यात आले आहे.
डिंपल पब्लिकेश,जीवनगाणी आणि मेराक इव्हेंट्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याआधी लेखिका रेखा चवरे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी चार पुस्तके लता मंगेशकर,एक आशा भोसले आणि एक हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर आहे.
रेखा चवरे यांच्या पुस्तकांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

