दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट, ”
” अल निनो,” च्या संकटाची चाहूल…
अल निनोची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, हे सर्वप्रथम जाणुन घेवूया.स्पॅनिश भाषेत ” ” लहान बाळ, ” असा या शब्दाचा अर्थ आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ०.५ सेंटीग्रेड पेक्षा अधिक वाढले कि अल निनोचा प्रभाव वाढतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास समुद्र तापला कि जगभरातील पावसाचे गणित बिघडते.
परिणाम :-
१ ) पाऊस लांबणीवर पडतो किंवा तो कमी होतो.
२ ) मान्सून पंधरा ते वीस दिवस उशिरा येतो.
३ ) परिणामत : धरणाच्या पाणीसाठ्यात घट होते.
४ ) कृषी उत्पन्न १५ ते २० टक्क्याने घटते,
आपल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सौम्य अल निनोची शक्यता आहे.
• ऑक्टो. महिन्यात उष्णतेचे प्रमाण अधिक राहणार,
• रब्बी हंगामासाठी पाणी जपून वापरावे लागणार आहे,
त्यावर उपाययोजना :-
• पावसाचे पाणी साठवण ( रेनवॉटर हार्वेस्टिंग ) सक्तीचे करणे,
• शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत,
• विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ( उदा. रेल्वे स्थानके, एसटी आगारे व अन्य सार्वजनिक ठिकाणे )
या अल निनोचा फटका थेट जागतिक अन्न सुरक्षेला बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे जुलै २०२७ पर्यंत सरकारने पिण्याच्या पाण्याचा व्यापक आराखडा तयार करणे,
अल निनोमुळे साडेतीन कोटी टन चाऱ्याची तूट निर्माण होणार आहे, ती लक्षात घेऊन सरकारने ग्रामीण भागात चारा उपलब्ध करायला हवा.
अल निनोचा प्रभाव फेब्रु. २०२७ मध्ये शिखर गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने वेळीच सावध होण्याची गरज आहे.
• या संकटाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामाला बसणार असल्यामुळे कृषी विभागाने रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्याची गरज आहे.
• रब्बी हंगामात कमी पाण्यात घेण्यात येणाऱ्या पिकाच्या व्यवस्थापनाची गरज आहे.
सध्या हवामानात होणारे बदल, हे अल निनोचे संकट घोंगावू लागल्याची चिन्हे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी या संकटाचे स्वरूप कसे असेल, याविषयी भाष्य केले होते. त्यामुळे सरकार देखील आपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

