दीपक मोहिते,
खातेदारांना दिलासा,
सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा, नवीन सातबारे मिळणार,
पालघर तालुक्यातील मौजे हनुमाननगर व मौजे नेवाळे येथील सूर्या प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या जमीन नोंदींबाबत राज्य मंत्रिमंडळाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या निर्णयानुसार संबंधित प्रकरणांचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २५७ अन्वये प्रकरणनिहाय पुर्ननिरीक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध वाटप आदेश, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष ताबा, शेतीवहिवाट आणि आवश्यक क्षेत्रीय पडताळणीच्या आधारे पात्र खातेदारांच्या नोंदी अद्ययावत करून नवीन ७/१२ उतारे तयार करण्यात येणार आहेत.
अद्ययावत ७/१२ नोंदींमुळे पात्र खातेदारांना जमीनविषयक व्यवहार, पीक कर्ज, पीक विमा तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक अभिलेख उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदराशी संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतही संबंधित जमीनधारकांच्या हक्कांची पडताळणी आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही सुलभ होणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे महसूल, पुनर्वसन आणि भूमी अभिलेख विभागांच्या समन्वयातून ही प्रक्रिया नियमानुसार राबवण्यात येणार आहे.

