- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- अर्नाळा समुद्रकिनारी विद्यार्थ्याकडून स्वच्छता मोहीम,
- आम्ही स्थानिक भूमिपुत्र अक्षरशः नागवले गेलो…
- २ ऑक्टो.रोजी वसईत साहित्य मेळाव्याचे आयोजन,
- असा विकास व बदल कोणाच्याही नशिबी येऊ नये,
- यंदा पालघर व ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस,
- पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन,
- ऐतिहासिक वसई नगरीची अवघ्या काही वर्षात वाताहात झाली…
- कोकण कात टाकतोय, फक्त स्थानिकांचे पाठबळ हवे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, परिवहन समिती सदस्यानो ” लगे रहो, ” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीवर निवडून आल्याच्या जाहिराती व माध्यमावरील पोस्ट पाहून वसई विरार शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसात आश्चर्याचे सुखद धक्के बसले. सर्वप्रथम या समितीवर निवडणुका होतात कि नियुक्त्या ? हे समजून घेणे गरजेचे आहे. वास्तविक या संविधानिक आधार नसलेल्या समितीवर सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीतील लोकांच्या नियुक्त्या करत असतो.पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे सदस्य जाहिराती व पोस्ट टाकून आपली पाठ थोपटून घेत असतात. समितीच्या बैठका या केवळ चहा व बिस्किटे खाण्यापूरत्या असतात. पण कोणताही अधिकार नसलेल्या या समितीचे सदस्य नियुक्त्या झाल्यानंतर मात्र सहस्त्र हत्तीचे बळ संचारल्यासारखे फिरू लागतात.…
दीपक मोहिते, हल्लाबोल तीन पैश्याचा तमाशा बंद करा… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत जो तीन पैश्याचा तमाशा करदात्यांना पाहायला मिळतो, त्याचा अक्षरशः उबग आला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक, हे सार्वजनिक नळावर भांडणाऱ्या महिलासारख्या भांडत असतात. त्यांच्या या भांडणाशी करदात्यांना कोणतेही देणेघेणे नाही. आमच्यावर लादण्यात आलेली भरमसाठ करवाढ, शहरातील अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, पैश्याची उधळपट्टी व वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे या अशा संवेदनशील विषयी हे दोन्ही पक्ष चकार शब्द बोलत नाहीत, हे खऱ्या अर्थाने करदात्यांचे दुःख आहे. या महानगरपालिकेला तब्बल १६ वर्षे होत आली, पण ही महानगरपालिका अद्याप कुपोषितच आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी हे सुदृढ बालक स्पर्धेत भाग घेऊ शकतील,…
दीपक मोहिते, आपल्या देशात पर्यटनवाढीसाठी चांगले वातावरण, आज २७ सप्टें. २०२६ रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरात ” जागतिक पर्यटन दिन, ” म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची थीम ” डिजिटल अजेंडा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे पर्यटनाची पुनर्रचना,” अशी आहे. याद्वारे पर्यटन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ते अधिक सोपे आणि शाश्वत बनवण्यावर भर देण्यात येत आहे. यंदा मुख्य जागतिक कार्यक्रमांचे यजमानपद एल साल्वाडोर या देशाला देण्यात आले आहे. १९८० पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने ( युएनडब्ल्यूटीओ ) या दिनाची सुरुवात केली. १९७० मध्ये या संघटनेच्या कायद्याला मंजुरी मिळाली होती,…
दीपक मोहिते, राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा… राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी जिल्ह्याची नुकतीच पाहणी केली व लवकरच दुष्काळ जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. मात्र याविषयी अधिसूचना काढण्यासंदर्भात अडचणी येत असल्यामुळे दुष्काळ जाहीर करता येत नाही, असे सांगण्यात येत आहे. दुष्काळ जाहीर करण्याची नवीन पद्धत ट्रिगर सिस्टीम स्विकारण्यात आल्यामुळे या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारकडून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यापूर्वी जुन्या पद्धतीने तात्काळ आणेवारी जाहीर व्हायची, ज्या जिल्ह्यात ५० पैश्यापेक्षा कमी आणेवारी असायची तेथे जिल्हाधिकारी दुष्काळ जाहीर करत असत. ही प्रक्रिया अत्यंत जलदगतीने…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” रितिका चोप्रा यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…. पत्रकारितेतील चाटूगिरीच्या बजबजपुरीत इंडियन एक्सप्रेसच्या महिला पत्रकार रितिका चोप्राच्या रूपाने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. पत्रकारितेला चाटूगिरीचे ग्रहण लागले असताना रितिका चोप्रा यांनी जे धाडस दाखवले, त्याची तुलना अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणांशी केली तर ते चुकीचे ठरणार नाही. सर्वप्रथम ५० वर्षांपूर्वी घडलेले हे वॉटरगेट प्रकरण काय होते ? ते कसे घडले ? व राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे कसे चोर ठरले ? ते सर्वप्रथम समजून घेऊया. वॉशिंगटन डी. सी.मधील वॉटरगेट या आलिशान इमारतीमध्ये डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय होते.१७ जून १९७२ रोजी रात्री दोन वाजता सुरक्षा रक्षक फ्रॅंक विल्स याला…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषक रायगड जिल्हा,राजकीय स्थिती, येणाऱ्या काळात खा. सुनील तटकरे यांची अग्नीपरीक्षा, रायगड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे सगळ्यात मोठा ” गेम ऑफ थ्रोन्स, ” असा आहे. सरकारमधील तीन राजकीय पक्ष एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानतात व ते एकमेकांच्या विरोधात सतत लढत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) सुनील तटकरे, पालकमंत्री भरत गोगावले ( शिवसेना शिंदे गटाचे ) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या तिघांमधून सध्या विस्तव जात नाही. या जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. अलिबाग – महेंद्र दळवी – शिवसेना ( शिंदे गट ), पेण – रवि पाटील – भाजप, महाड – भरत गोगावले – शिवसेना ( शिंदे…
दीपक मोहिते, राजकीय विश्लेषण, उत्तर प्रदेशात काँग्रेस सपासोबत लढणार की भाजपशी थेट भिडणार ? उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत राहणार की स्वबळावर लढणार ? हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले नाही तर भाजपला मतविभागणीचा फायदा होऊ शकतो.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सपा सोबतच राहणार आहे. पण जागावाटपावरून त्यांच्यामध्ये सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. २०२४ च्या लोकसभेत समाजवादी पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंडिया आघाडीने भाजपला यूपीमध्ये ४३ जागांवर रोखले होते. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही आघाडी कायम राहीली आहे. राहुल गांधी आणि…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपच्या कार्यकर्त्याकडून वसुलीच्या कामाना वेग, नालासोपारा शहर विविध कारणामुळे सतत बदनाम होत असते. गुन्हेगारी, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, अनधिकृत रिक्षा व्यवसाय व बांधकामे व पोलिसांकडून होणारी वसुली, इ. गैरप्रकार या शहरातील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. याच सुमारास आज एका व्यापाऱ्याला धमकावणारा विडिओ कॉल समोर आला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा पती या व्हिडियो क्लिपमध्ये व्यापाऱ्याला धमकी देत असल्याचे ऐकायला मिळाले. या व्यापाऱ्याने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी माध्यमासमोर केली. हे तिघे व त्यांचे अन्य दहा ते बारा सहकारी शहराच्या भाजीमार्केटमध्ये लहान विक्रेत्यांना धमकावून वसुली करत असतात, असा थेट आरोप त्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” महाराष्ट्रात समान नागरी कायदा लवकरच लागू होणार, राज्य सरकार लवकरच समान नागरी कायदा विधेयक आणणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या ७ सदस्यीय समितीला ६ महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले असून येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. देशात सध्या गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यात समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात पोर्तुगीज काळापासून म्हणजे १८७० पासून हा कायदा लागू आहे. तर उत्तराखंडने १२ मार्च २०२४ रोजी देशात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर युसीसी लागू केला. आसाममध्येही याच महिन्यात युसीसी विधेयक मांडण्यात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा…
दीपक मोहिते, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा – विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, वसई-विरार महानगरपालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात, तसेच नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले,घनकचरा व्यवस्थापनातील ३८ कोटी रु.च्या घोटाळ्यात केवळ ठेकेदारच दोषी नसून ज्या अधिकाऱ्यांनी ही बिले तपासून मंजूर केली, ज्या कन्सल्टंटने प्रक्रियेला मान्यता दिली आणि ज्यांनी पेमेंट दिले, ते सर्व अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदाराने…
