दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपच्या कार्यकर्त्याकडून वसुलीच्या कामाना वेग,
नालासोपारा शहर विविध कारणामुळे सतत बदनाम होत असते. गुन्हेगारी, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, अनधिकृत रिक्षा व्यवसाय व बांधकामे व पोलिसांकडून होणारी वसुली, इ. गैरप्रकार या शहरातील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.
याच सुमारास आज एका व्यापाऱ्याला धमकावणारा विडिओ कॉल समोर आला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा पती या व्हिडियो क्लिपमध्ये व्यापाऱ्याला धमकी देत असल्याचे ऐकायला मिळाले. या व्यापाऱ्याने माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी माध्यमासमोर केली. हे तिघे व त्यांचे अन्य दहा ते बारा सहकारी शहराच्या भाजीमार्केटमध्ये लहान विक्रेत्यांना धमकावून वसुली करत असतात, असा थेट आरोप त्या व्यापाऱ्याने केला आहे. अलीकडच्या काळात अनेक भाजपचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात वसुलीचे काम करत असतात. काही महिन्यापूर्वी एक भाजपचा कार्यकर्ता नगरसेवकाचा हस्तक म्हणून अनधिकृत चाळी बांधणाऱ्यांकडून वसुली करत होता, त्याचीही व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा हस्तक सध्या नाहीसा झाला आहे. कालच्या प्रकरणामुळे भाजपची विश्वासाहर्ता पार रसातळाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या पक्षाला पुन्हा निवडून येणे शक्य नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता वसुलीच्या कामाला वेग दिल्याचे स्पष्ट होत आहे.

