दीपक मोहिते,
आंतराष्ट्रीय घडामोडी : विश्लेषण,
दोन्ही सभागृहात पराभव झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आले अडचणीत,
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीकडे ट्रम्पची हार म्हणून बघणे चुकीचे ठरेल. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आहे. या मध्यावधी निवडणुकीत अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना स्पष्टपणे नाकारलंय. ट्रम्प वरकरणी मी डेमोक्रेट्स बरोबर काम करायला तयार आहे, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे वेटो असे लिहिलेली टोपी डोक्यावर घालत, मी डेमोक्रेट्सना रोखण्यासाठी वेटोचा वापर करीन, असे धमकावत आहेत. आपल्या पहिल्या कार्यकालात त्यानी अनेकदा वेटो वापरला होता. त्यामुळे आगामी काळात ट्रम्प व डेमोक्रेट्स असा संघर्ष अमेरिकन जनतेला पाहावा लागणार आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज – एकूण ४३५ जागा,
सिनेटच्या १०० जागा,
निकाल :
हाऊस :डेमोक्रॅट्स – 228, रिपब्लिकन – 139
सिनेट : डेमोक्रॅट्स – 54 जागा, रिपब्लिकन – 44 जागा*
डेमोक्रॅट्सनी हाऊसच्या ३९ जागा आणि ७ सिनेट जागा रिपब्लिकन पक्षाकडून हिसकावून घेतल्या.रिपब्लिकननी डेमोक्रेट्सच्या फक्त २ जागा जिंकल्या.
गेल्या २० वर्षांत ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षाने दोन्ही सभागृहे गमावली आहेत. याआधी २००६ मध्ये जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीत असं घडलं होतं. या निवडणुकीत ट्रम्प यांचे बालेकिल्लेच कोसळले.
ट्रम्प यांनी २०२४ मध्ये मोठ्या फरकाने जिंकलेल्या राज्यांतच डेमोक्रॅट्स जिंकले.
टेक्सास : १९८८ नंतर पहिल्यांदा डेमोक्रॅट जेम्स टॅलारिको यांनी ट्रम्प यांचे जवळचे सहकारी केन पॅक्सटन यांना हरवलं. गव्हर्नरपदही डेमोक्रॅट जिना हिनोजोसा यांनी जिंकलं – ग्रेग अबॉट यांचा पराभव. कॅन्सस : १९३२ नंतर, म्हणजे ९४ वर्षांनंतर पहिल्यांदा डेमोक्रॅट अँडम हॅमिल्टन जिंकले.
साऊथ कॅरोलिना : १९८८ नंतर पहिल्यांदा डेमोक्रॅट अँनी अँड्र्यूज जिंकल्या. ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेल्या डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव झाला.
नॉर्थ कॅरोलिना : रॉय कूपर जिंकले, ट्रम्प यांचे मायकेल व्हॉटली पराभूत.
मिशिगन : अब्दुल अल-सईद – अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर झाले.
जॉर्जिया : केइशा लान्स बॉटम्स – अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला गव्हर्नर बनल्या.
ओहायो, आयोवा, मेन : सगळ्या जागावर डेमोक्रॅट्सनी बाजी मारली, ट्रम्प यांनी स्वतःच या निवडणुकीला जनमत चाचणी बनवलं होतं – ” मला मतदान करताय,असं समजून मतदान करा,” असं त्यांनी मतदारांना आवाहन केले होते.
त्यांच्या या दारुण पराभवाच्या मागे चार कारणे आहेत.
१ ) महागाई आणि जगणं महाग झालं,
सप्टें.पर्यंत अमेरिकेत महागाई ३.७ % होती. एक्झिट पोलमध्ये ८० % मतदारांनी सांगितलं की महागाईमुळे घरावर ” गंभीर किंवा मध्यम,” आर्थिक ताण आला. ६७ % लोकांनी सांगितलं की ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था पार बिघडली.२०२४ मध्ये ट्रम्प महागाईच्या मुद्द्यावरच जिंकले होते, २०२६ मध्ये त्याच मुद्द्यावर हरले.
२ ) इराण युद्ध,
अमेरिका-इस्त्रायलच्या कारवाईनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली, त्यामुळे पेट्रोलचे भाव भडकले. ६३ % मतदारांनी सांगितलं की युद्धाचा निर्णय चुकीचा होता.
ट्रम्प यांनी स्वतः फॉक्स न्यूजला कबूल केलं – ” या पराभवाला इराण युद्ध कारणीभूत ठरले.” उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनीही X वर लिहिलं – “आपण हरलो याचं कारण युद्धच आहे.”
३ ) टॅरिफ – कर,
आयातीवर लावलेल्या प्रचंड टॅरिफमुळे किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, गाड्या महाग झाल्या. सामान्य मतदाराला याचा थेट फटका बसला.
४ ) ट्रम्प यांची शैली,
प्रचारात ट्रम्प स्वयंपाकघरातील मुद्द्यांपेक्षा व्हाईट हाऊसचा बॉलरूम, हेलिपॅड, विजयी कमान,अशा स्वतःच्या प्रोजेक्ट्सबद्दल जास्त बोलत होते, असा आरोप झाला. मतदारांना वाटलं की राष्ट्राध्यक्ष त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत.आता ट्रम्प शासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत.पुढील २ वर्षे ट्रम्प यांच्यासाठी ” लेम डक,” म्हणजे पंख कापलेला राष्ट्राध्यक्ष – अशी असणार आहे.
अ ) कायदे अडकणार,
आता कोणताही कायदा पास करायचा असेल तर डेमोक्रॅट्सची परवानगी लागणार. ट्रम्प यांचा अजेंडा – इमिग्रेशन कडक करणे, टॅक्स कपात, इराण धोरण – हे सगळं अडकणार. डेमोक्रॅट्सना सिनेटमध्ये ६० जागा नाहीत, त्यामुळे ते स्वतःचे मोठे कायदेही करू शकणार नाहीत, पण ट्रम्प कायदे रोखू शकतात. याला अमेरिकेत ” ग्रिडलॉक,” म्हणतात,
ब ) चौकश्या आणि महाभियोगाचा धोका,
जाने. २०२७ पासून डेमोक्रॅट्स हाऊस कमिट्यांचे प्रमुख होतील. त्यांना समन्स पाठवून चौकशी करण्याचा अधिकार मिळेल.
*इराण युद्धाचा निर्णय*
*इमिग्रेशन कारवाईतील अतिरेक ट्रम्प कुटुंबाचे* *व्यवसाय, क्रिप्टो व्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप याच्या चौकश्या सुरु होणार. हाऊसचे संभाव्य स्पीकर हकीम जेफ्रीज आणि डेमोक्रॅट रॉबर्ट गार्सिया यांनी आधीच संकेत दिलेत. पेंटॅगॉन प्रमुख पीट हेगसेथ यांच्यावरही महाभियोगाची चर्चा सुरू आहे.
क ) नियुक्त्या अडकणार,
न्यायाधीश, राजदूत, मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्या नियुक्त्यांना सिनेटची मंजुरी लागते. आता डेमोक्रॅट सिनेट ट्रम्प यांच्या वादग्रस्त नियुक्त्या रोखू शकते.
ड ) २०२८ ची निवडणूक धोक्यात,
ट्रम्प यांचा पराभव झाल्यावर त्यांनी सांगितलं की जे.डी. व्हान्स २०२८ ला उभे राहतील की नाही, हे माहीत नाही. रिपब्लिकन पक्षातच आता अंतर्गत भांडणे सुरू झाली आहेत, ट्रम्प यांना दोष द्यायचा की पक्षाच्या नेतृत्वाला, यावरुन ही भांडणे सुरु झाली आहेत.
इ ) परराष्ट्र धोरणावर दबाव,
इराण युद्ध, इस्त्रायलशी संबंध, युक्रेन, चीनशी टॅरिफ युद्ध – या सगळ्यावर काँग्रेस आता ट्रम्प यांना जाब विचारणार. युद्धासाठी निधी देणंही आता अवघड होणार.
ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आता काँग्रेसच्या दबावामुळे सौम्य होऊ शकतं, भारतासारख्या देशांसाठी ही दिलासादायक बाब.*
*अमेरिकेत राजकीय अस्थिरता वाढली तर डॉलर, तेलाचे भाव, शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.
*पण अमेरिकेचं भारताशी असलेलं धोरण – चीनला रोखणं – यात फारसा बदल होणार नाही, कारण त्यावर दोन्ही पक्षांचं एकमत आहे. पण प्रत्यक्षात पुढील २ वर्षे ही ट्रम्प यांच्यासाठी बचावाची लढाई असणार आहे. सत्ता हातात असूनही काँग्रेस हातात नसल्याने, ट्रम्प आता पूर्वीसारखे एकहाती निर्णय घेऊ शकणार नाहीत.

