Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, अस्तित्वाची लढाई, २२ सप्टें. नंतर होणाऱ्या सुनावण्यानंतर चित्र स्पष्ट होणार, धनुष्यबाण व शिवसेना नावाचा वाद आता अंतिम टप्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रु. २०२३ रोजी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला मूळ शिवसेना मान्यता देत नांव व चिन्ह दिले होते. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ३० जून २०२६ पासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमल्या बागची व न्या. व्ही. मोहना, यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. या खटल्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. आता पुढील…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” १२ उत्सव संपला ; आता प्रतिक्षा आहे १३ व्या उत्सवाची… गेल्या सहा वर्षातील बारावा उत्सव काल पूर्ण झाला. परदेशात असलेल्या उद्योगमंत्र्यांनी जरांगे यांना एक कॉल केला व जरांगे यांचा राग नाहीसा झाला व त्यांनी सरकारला तीन महिन्याची मुदत दिली व सरकार व जरांगे हे दोघेही निवांत झाले. त्यांच्या या निर्णयाचे मराठ्यांनी किती स्वागत केले, हे मात्र कळू शकले नाही. असो, जरांगे पाटलांच्या बाराव्या उत्सवाची अशाप्रकारे इतिश्री झाली. या सर्व धडामोडीमुळे मराठ्यांचा आरक्षण या विषयावरून आता विश्वास उडत चालला आहे. बिचारे मराठे आजवर आपल्या मुलाबाळांना आरक्षणाचा फायदा मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशा भाबड्या आशेतून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” पालघर जिल्ह्यावर अनेक प्रकल्प लादून सरकार स्थानिकांना देशोधडीला लावत आहे, पालघर जिल्ह्याचा समुद्रकिनारा उद्योग व्यवसायासाठी उपयुक्त आहे, हे वास्तव लक्षात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने गेल्या २५ वर्षात पालघर बजिल्ह्यावर एकामागोमाग एक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. मानवनिर्मित या विनाशकारी प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्र आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जमिनीला भरमसाठ भाव देणे व भूमिपुत्रांच्या मुलाबाळांना नोकरीत सामावून घेणे, अशी गाजरे दाखवत सरकार त्यांना नागवू पाहत आहे. १९७० च्या दशकात पालघर – बोईसर भागात केंद्रसरकारने अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा १ व २ हा प्रकल्प कार्यान्वित केला, त्यासाठी त्या भागातील नागरिकांना अक्करपट्टी व पोफरण या दोन गावात स्थलांतर…

Read More

दीपक मोहिते, २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य, मी कालच दिल्लीवरून मुंबईला परतलो, दिल्लीच्या या भेटीत मी मंत्रालयाचे अनेक अधिकारी व एनजिओच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. तसेच महाराष्ट्रातील काही आमदार व खासदार यांचीही आवर्जून भेट घेतली. या भेटीत अनेक विषयावर चर्चा केली. त्यामध्ये समान नागरी कायदा, एसआयआर, जातीनिहाय जनगणना, धर्मांतरबंदी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन इ. विषयाचा समावेश होता. उत्तराखंड मागोमाग महाराष्ट्र सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे या भेटी दरम्यान कळले. तसेच देशात मोठ्याप्रमाणात वगळण्यात आलेल्या मतदारसंदर्भात अनेक ज्येष्ठ विधीतज्ञानी आपली मते व्यक्त केली. दिल्लीतील राजकारण हे इतर राज्यातील राजकारणापेक्षा वेगळे असते. येथे खूप काही शिकायला मिळते.…

Read More

दीपक मोहिते, परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल, गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचे सांगण्यात येत आहे. तसा मिटला असेल तर ती आनंदाची बाब आहे. पण हे कर्मचारी वारंवार संप का करतात ? त्यांच्या नेमक्या अडचणी व समस्या काय आहेत ? याचा शोध घेऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. वसई विरार शहर मनपाची ही परिवहन सेवा ठेक्यावर चालवण्यात येते. दशकापूर्वी सुरु करण्यात आलेली ही सेवा सुरवातीपासूनच अडखळत सुरु आहे. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, तेही वेळेवर न देणे, विस्कळीत व्यवस्थापन, आगारा अभावी बसेस रस्त्यावर उभ्या करणे, बसेसमधील अस्वच्छता व कर्मचाऱ्याचे वारंवार होणारे…

Read More

दीपक मोहिते, वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो, शिक्षक गौरव दिन आणि गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा विरार पश्चिमेस उमराळे गावात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना गोम्स आळी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. फिलिप गोन्सालविस म्हणाले, वर्गात सर्वांत सुंदर शिक्षक असतो. शिक्षक घडवतो लेखक, कवी, संशोधक, शास्रज्ञ, डाँक्टर, वकील, तत्त्वज्ञ, गायक, समाजसुधारक.आपण जे घडवता ते लक्षवेधी शिल्प आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमराळे चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. नितीन डिसोजा होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी,वेगवेगळे प्रभाव निर्माण करत असतो. शिक्षकांचे एखादे वाक्य वा त्यांनी दिलेली पाठीवरील शाबासकीची थाप विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असते. याप्रसंगी दहा सेवानिवृत्त…

Read More

दीपक मोहिते, वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसांच्या गणपतींच्या मूर्तींचे उत्साहात विसर्जन, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात काल दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना यावर्षीही उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी दीड दिवसांच्या एकूण १२ हजार ९८७ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. यामध्ये ११ हजार ९७४ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले, तसेच १ हजार १३ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने सोय केलेल्या जेटी, फिरते हौद व बंद दगडखाणीच्या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. यंदा मूर्ती विसर्जनासाठी…

Read More

दीपक मोहिते, शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक दोन नव्हे, सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड, मुस्लिम राष्ट्रात विरोधकांना फाशीची शिक्षा देण्याची परंपरा अव्याहतपणे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण-२ ( आयसीटी – २ ) ने प्रतिबंधित केलेल्या अवामी लीगच्या सात नेत्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना २०२४ च्या विद्यार्थी आंदोलना दरम्यान हिंसा भडकवणे आणि मानवतेच्या विरोधात गंभीर गुन्हा केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या सातही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे बांगलादेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जस्टीस मोहम्मद नजरुल इस्लाम चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या सर्व…

Read More

दीपक मोहिते, ” या चिमण्यानो, परत फिरा रे,” कोकणातील तरुण हे गावात रोजगार नसल्यामुळे आपापली गावे सोडून शहरी भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. सणासुदीच्या काळात हे तरुण आपल्या बायका मुलासह गावी येत असतात. त्यांचा सात ते आठ दिवसाचा काळ हा त्यांच्या वृद्ध आई – वडीलासाठी सुवर्णंकाळ असतो. पण ही मुले जेव्हा परत निघतात, तेंव्हा आयुष्याची संध्याकाळ सुरु झालेल्या त्या आईवडिलांच्या जीवांची घालमेल पाहवत नाही. वर्षाचे ३५० दिवस एकाकी जीवन जगणाऱ्या त्या वृद्ध माता पित्याच्या चेहऱ्यावर ” आता जगणं बस झाले, ” असे भाव असतात. मनातल्या मनात ” चिमण्यानो परत फिरा रे, ” ही…

Read More

*दीपक मोहिते,* पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी, *दहीहंडी उत्सवानंतर पालघर येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांशी गैरवर्तन करणे, रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तसेच अतिदक्षता विभागात शिरल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी संशियत असणाऱ्या १० आरोपींपैकी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्यासह आठ ज्ञात व एक अन्य संशयित आरोपी रवि. सकाळी पालघर पोलीस स्टेशनमध्ये शरण आले.* *या प्रकरणातील २३ पैकी २२ आरोपींना न्यायालयाने १६ सप्टें.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.* *पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( रिमांड कोर्ट क्र. ४ ) योगेश एच. गजभिये यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.* *पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिवसैनिकांनी धुडगूस घातल्या…

Read More