- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तीन पैश्याचा तमाशा बंद करा…
- जागतिक पर्यटन दिन ; आपल्या देशात पर्यटनवाढीसाठी चांगले वातावरण,
- राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा…
- रितिका चोप्रा यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच….
- येणाऱ्या काळात खा. सुनील तटकरे यांची अग्निपरीक्षा,
- उत्तर प्रदेशात काँग्रेस, सपासोबत लढणार कि भाजपशी थेट भिडणार ?
- भाजपच्या कार्यकर्त्याकडून वसुलीच्या कामाना वेग,
- महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, केंद्रिय निवडणूक आयोगात बेदीली, निवडणूक आयोगात जी बेदीली माजली आहे, तीचा निषेध करावा, तेवढा थोडाच, एका मराठी दैनिकाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्ताविरोधात इतर दोन आयुक्तानी कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर केंद्र सरकारही आता अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यात सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी, या दोन आयुक्तानी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेकुमार यांच्याविरोधात १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. पण त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी अखेर कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केली आहे.या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. अनेक प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मनमानीपणा केल्याचे या दोन आयुक्ताचे म्हणणे आहे. यामध्ये फॉर्म ६ मधील बदल,मतदारयाद्यांचे केंद्रिकरण,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नाशिक राज्यव्यापी शिबिरानंतर सुनील तटकरे यांचे राजकीय भवि्तव्य पणाला लागणार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार उलथापालथी सूरू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार या दोघांनी पक्षातील प्रस्थापित नेत्यांना वेसण घालण्यासाठी कंबर कसली आहे. याकामी त्यांना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची मदत होत आहे. आई व लेकाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे री – लॉंचिंग होणार आहे. यावेळी पक्षाचा नारा बदलण्यात येणार आहे. अजितदादा हयात असताना ” एकच वादा, अजित दादा असा नारा होता, त्याऐवजी ” आपल्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” वन नेशन, वन इलेक्शन ; २०२९ किंवा २०३४ पासून लागू होण्याची शक्यता ? मोदी सरकारची तिसरी टर्म सूरू झाल्यानंतर देशात ” वन नेशन,वन इलेक्शन, ” या योजनेच्या चर्चेला वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी २ सप्टेंबर २०२३ रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समिती नियुक्त केली.या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, माजी खा. गुलाम नबी आझाद, १५ व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के. सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, माजी दक्षता आयुक्त, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, यांचा समावेश आहे. या समितीने १९१ दिवस…
दीपक मोहिते, आम्ही खरंच पस्तावलो – वसई / नालासोपाऱ्याचा पापभीरू मतदार वसई विरार उपप्रदेशाला आता नागरिकांना कोणीच वाली उरलेला नाही. वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन करणाऱ्या नागरिकांनी दोन वर्षांपूर्वी ३५ वर्षाची सत्ता एका दमात उलथवून टाकली. भाजपचा पर्याय समोर आल्यामुळे नागरिकांनी हे धाडसी पाऊल उचलले खरे, पण आज त्या नागरिकांवर पश्चाताप करण्याची पाळी आली आहे.एक खासदार व दोन आमदाराच्या शिदोरीवर भाजपच्या अंगावर सत्तेची झूले चढली. पण त्यांना अवघ्या वर्षभरात झालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेची तिसरी निवडणूक जिंकता आली नाही. त्यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपमधील गटबाजी व ” हा माझा, हा तुझा, ” हा…
दीपक मोहिते, राज्यात १९ जिल्ह्यातील ८३ तालुके दुष्काळग्रस्त, राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे राज्याच्या १९ जिल्ह्यातील ८३ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात या सर्व जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारने ऑक्टो. च्या पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्याची तयारी चालवली आहे. पुणे वेधशाळेने जाहीर केलेल्या माहितीनुसार मराठवाडा व विदर्भ विभागात ३० % पेक्षा अधिक पावसाची तूट आहे. अति गंभीर जिल्हे – ( ४० % पेक्षा अधिक तूट ) सोलापूर – ५७ % तूट, बीड – ५२ %, हिंगोली – ४९ %, जालना – ४६ %, धाराशिव – ४६ %, अहिल्यानगर…
दीपक मोहिते, स्पॉटलाईट, जगभरात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती अत्यंत धोकादायक, गेल्या १० वर्षात जगभरात निर्माण झालेली अशांतता व अनेक देशांनी स्विकारलेले विस्तारवादी धोरण लक्षात घेता जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचे जाणवत आहे. पण तिसरे महायुद्ध होईल, असे अनेक युद्धविषयक अभ्यासकाना वाटत नाही.अनेक विकसित देश हे अन्वस्त्रधारी असल्यामुळे महायुद्ध झाल्यास अवघे जग बेचीराख होईल, त्यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. नुकत्याच झालेल्या भारत – पाक युद्धात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दोन्ही देशांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध थांबवले. दुसऱ्या महायुद्धातील जखमा अद्याप भरून निघालेल्या नाहीत. तो अनुभव लक्षात घेता जगातील सारे देश अशाप्रकारचे धाडस करतील असे वाटत नाही.…
दिपक मोहिते, पब्लिक क्राय हा न्यायदान प्रक्रियेत अडथळा होता कामा नये, रमेश किणी व्हाया पूजा चव्हाण ते थेट दिशा सालियन असा जो कटकारस्थानाचा प्रवास झाला. यामध्ये बदनामीचा एक समान धागा असल्याचे दिसून येते. या तिन्ही प्रकरणात सेम पॅटर्नचा वापर झाल्याचे पाहायला मिळत आहे. १९९५ महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत विराजमान झाले व हा बदनामीचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी रमेश किणी हत्याप्रकरणी बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे राज्यसरकारने मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यांनी केलेल्या तपासामध्ये राज ठाकरे यांना क्लीनचिट मिळाली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबई पोलिसांच्या तपासावर राजकीय दबाव होता, असे आरोप…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अहो आश्चर्यम… बाप्पा सुरक्षितपणे आले व जीव मुठीत धरून परतले… गरीब बिच्चारे बाप्पा, कसे बसे,आले, व भक्तांना आनंद देऊन आल्या पावली जीव मुठीत धरून परतले. आता सार्वजनिक मंडळाचे गणपती ” पुढच्या वर्षी नक्की या, ” अशा जयघोषात निघतील. सुरुवातीला विरार, नालासोपारा, नवघर – माणिकपूर व वसई या चार महानगरातील रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून बाप्पाच्या काळजात धस्स झाले होते. बाप्पाची अवस्था त्यावेळी सासरी निघालेल्या पण धास्तावलेल्या सुनेसारखी झाली होती, ” येऊ कसा मी नांदायला गो येऊ कसा मी नांदायला, ” असे गुणगुणत बाप्पा भक्ताच्या विनंतीला मान देऊन या चार महानगरात दाखल झाले व पाच दिवसाच्या वास्तव्यानंतर ते…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” भारताचे १२ हजार नागरिक १३ देशाच्या तुरुंगात… आशिया खंडातील अनेक देशाचे नागरिक विविध गुन्ह्याखाली अनेक देशाच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. या नागरिकांचे देश आपापल्या परीने त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करत असतात. मात्र ही प्रक्रिया अत्यंत किचकट स्वरूपाची असल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळू शकत नाही. गेल्या काही वर्षात भारताचे पाकिस्तान – २१९, चीन – १७३, इटली – १६८, श्रीलंका – १४३, नेपाळ – ११८७, अमेरिका – २४७९, संयुक्त अरब अमिराती – २७७३, कतार – ७४०, थायलंड – ५००, सौदी अरेबिया – २६४७, व कुवेत – ३८७,मलेशिया – ३७१ व युनायटेड किंगडम ( ब्रिटन ) – २८८ असे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” पालघर रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणी पालघर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात, पालघर रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे भविष्यात अशा मारहाणीच्या घटनाना पायबंद बसण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात डॉक्टर्स, कर्मचारी, बिल्डर्स, टोल नाक्यावरील कामगार यांना मारहाण करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याना अक्षरशः ऊत आला आहे. अशाप्रकारची मारहाण करताना ही टोळकी हॉस्पिटल्स, बिल्डर्सची कार्यालये व टोलनाके फोडत असतात. आपण काहीतरी जगावेगळे करत आहोत, हे समाजाला दाखवण्यासाठी हे सारे उपदव्याप करण्यात येत असतात. त्यासाठी सोबत युट्युबरना आवर्जून सोबत नेत असतात. मात्र डोंबिवली येथे डॉक्टर्स व महिला कर्मचाऱ्यांना व आता पालघर येथे झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने…
