दीपक मोहिते,
केंद्रिय निवडणूक आयोगात बेदीली,
निवडणूक आयोगात जी बेदीली माजली आहे, तीचा निषेध करावा, तेवढा थोडाच, एका मराठी दैनिकाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्ताविरोधात इतर दोन आयुक्तानी कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर केंद्र सरकारही आता अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यात सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी, या दोन आयुक्तानी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेकुमार यांच्याविरोधात १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. पण त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी अखेर कॅबिनेट सचिवाकडे तक्रार केली आहे.या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.
अनेक प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मनमानीपणा केल्याचे या दोन आयुक्ताचे म्हणणे आहे. यामध्ये फॉर्म ६ मधील बदल,मतदारयाद्यांचे केंद्रिकरण, प. बंगालमध्ये मतदारविरोधात अपीलाचे अधिकार कोणी दिले ? व गोव्यात पात्र मतदारांना सॉफ्टवेअरमध्ये डावलणे, अशा गंभीर प्रकरणाचा समावेश आहे.या सर्व आक्षेपाकडे निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, हे गेल्या तीन वर्षात अनेक प्रकरणी वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर सरकारधार्जिणे निर्णय घेण्यासंदर्भात विरोधकांनी सातत्याने टिकेची झोड उठवली. निवडणूक आयोगाचे कामकाज कसे चालावे ? याविषयी इतर दोन आयुक्तानी वेळोवेळी टिप्पणी व नोंदी केल्या, पण ज्ञानेशकुमार यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या ज्ञानेशकुमार यांच्यावर केंद्रसरकार काय कारवाई करते ? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

