- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला वेग,
- रिलीफ हॉस्पिटल राडा ; ११ आरोपीचा जामीन पुन्हा फेटाळला,
- वसई – विरारच्या नागरिकांना सुगीचे दिवस कधी येणार ?
- चांगल्या योजनांचा शासकीय अधिकारी व मध्यस्थ बट्ट्याबोळ करतात,
- दोन्ही सभागृहात पराभव झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आले अडचणीत,
- गोकुळमध्ये सरकारचा हस्तक्षेप ; सहकार क्षेत्राला मारक ठरणार,
- मोदी सरकारची वाटचाल आता काट्याकुट्यानी भरलेली,
- महामार्गांवरचा विकास गावापर्यंत कधी पोहोचणार ?
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, घडलंय बिघडलंय, वातावरण बदलत चालल्यामुळे फडणवीस कासावीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेत राहण्यासाठी काहीही करतात, हे आजवर अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळाले. काल त्यांनी देशात विरोधक रिजीम चेंज करण्यासाठी अराजकता निर्माण करत आहेत, असा आरोप करत भाजपतर्फे मोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चावर राज ठाकरे यांनी चांगलेच तोंडसूख घेतले.” अरे तुम्ही सत्तेत असताना आपल्याच सरकार विरोधात मोर्चे कसले काढता ? ” असा प्रश्न उपस्थित केला.भाजप उद्यापासून राज्यभरात मोर्चे काढणार आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी ठाण्यात पदयात्रा काढली होती. *वास्तविक भाजप हा सत्तेत असताना त्यांना आपल्याच सरकारविरोधात मोर्चे काढण्याची त्यांच्यावर पाळी यावी, ही एकप्रकारची शोकांतिका आहे. देश व राज्यातील सत्ता तुमच्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकनची पीछेहाट ; ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार, अतिरेकपणा फार काळ चालत नाही, हे अमेरिकन जनतेने आज दाखवून दिले आहे. ट्रम्प प्रशासनाचे युद्धाखोरीचे धोरण जनतेला मान्य नाही, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. सिनेटच्या झालेल्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाने ५२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजुन आठ जागांचे निकाल हाती यायचे आहेत. या निकालामुळे ट्रम्प यांना आता मनमानी कारभार करता येणार नाही. या सिनेट निवडणुकीत १०० जागांपैकी डेमोक्रॅट्सनी ५२ जागा तर रिपब्लिकनना ४० जागा मिळाल्या असून डेमोक्रॅट्सनी निसटता पण निर्णायक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नालासोपारा नागरिकांचे पलायन ; यापूर्वी असं कधीच घडलं नव्हते… दोन दिवसापूर्वी नालासोपारा शहराच्या पूर्व भागात जे काही घडलं त्याची तुलना मणिपूर येथे घडत असलेल्या घटनेशी केल्यास ते वावगे ठरू नये. प्रचंड दहशतीखाली असलेल्या श्रीरामनगर भागातील अनेक नागरिकांनी नेसत्या कपड्यांनीशी आपल्या बायका मुलासह पळ काढला व आपला जीव वाचवला. सदर बाब स्थानिक पोलीस, राज्याचे गृहविभाग व ज्यांच्यावर या विभागाची जबाबदारी आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नक्कीच लांछनास्पद आहे. यापूर्वी ” दहशतीला घाबरून लोकांचे पलायन,” असं कधीच घडलं नव्हतं, त्यामुळे महायुती सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवणारे हे गुंड कोण आहेत. याचा…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” नेहा बोरा ; एक अभ्यासू व आक्रमक नेतृत्व, आज आपण एक अशा व्यक्तींची माहिती घेणार आहोत, जीने गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारला अनेक हादरे दिले. २९ वर्षाची ही तरुणी मूळची खटीमा, उधमसिंग नगर, उत्तराखंड येथे राहणारी, वडील भारतीय लष्कराच्या सेवेत, या तरुणीचे नांव आहे नेहा बोरा. नेहाचे बालपण विविध शहरामध्ये गेले. त्या हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ,येथून समाजशास्त्राची पदवीधर झाली. तीचे पदव्युत्तर शिक्षण दिल्लीच्या डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात झाले. सध्या ती पी.एचडी करत आहे.त्यासाठी जेएनयूच्या स्कुल ऑफ आर्टस् अँड एस्थेटिक्स स्टडीजमध्ये संशोधन करत आहेत. दिल्लीच्या प्रसिद्ध पथनाट्य ग्रुप ” संगवारी, ” सोबत काम करते. त्यामुळे थियेटर…
दीपक मोहिते, हल्लाबोल, वाढवण बंदर ; स्थानिक ग्रामस्थाचे समुद्रात उतरून आंदोलन, गेल्या महिन्यापासून डहाणू तालुक्यातील वाढवण व वरोर गावातील भूमिपुत्र, वाढवण बंदरा विरोधात जीवाच्या आकांताने लढत आहे. या बंदराचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील शेकडो गावकऱ्यांनी समुद्रात धाव घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रस्तावित बंदराच्या कामाला पुन्हा सुरुवात होताच या दोन गावातील गावकऱ्याचा संताप उफाळून वर आला. शेकडो गावकऱ्यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यामध्ये महिला तरुण, तरुणी लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात उतरून त्यांनी मानवी साखळी केली व ” वाढवण बंदर रद्द करा, “…
दीपक मोहिते, गुंडाच्या दहशतीमुळे सुमारे १०० कुटुंबाचे घरदार सोडून पलायन, काल रात्री सुमारे १०० ते १५० तरुणांनी हातात तलवारी कोयते, लोखंडी सळ्या व लाठ्याकाठ्या घेऊन स्थानिक रहिवाश्याना जबर मारहाण केली. त्यामुळे या भागातील अनेक कुटंबानी आपली घरदारे सोडून पळ काढला. जेथे ही घटना घडली, त्या श्रीराम नगर येथे सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडून गेल्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले.तोवर हे गुंड पसार झाले व जाताना आम्ही पुन्हा येऊ अशी धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणी कोणी बोलायलाही तयार नाहीत. नालासोपारा शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार, अपहरण, लव जिहादच्या घटना, घरफोडी,अल्पवयीन…
दीपक मोहिते, विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये, ( अंतिम भाग ) आ. हरिश्चंद्र भोये ; आदिवासी समाजाचे बहूआयामी नेतृत्व, काही महत्वाच्या कामामुळे विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये यांच्यावर लेख वेळेवर लिहिता आला नाही. यापूर्वी वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित, नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक, पालघरचे आ. राजेंद्र गावित, बोईसरचे आ. विलास तरे व डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले यांच्या बाबतीत आम्ही सविस्तर विवेचन केले. पण विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या विषयी लेख लिहिण्यास थोडा उशीर झाला क्षमस्व, आ. हरिश्चंद्र भोये २०२४ साली पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले.अपेक्षेनुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा यांचा तब्बल ४१ हजार ४०८ मतांनी पराभव केला.भाजपच्या…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” एपस्टीन फाईलच्या कागदपत्रानी अनेकांची झोप उडवली… कालच्या भागात ” एपस्टीन फाईल, ” या लेखात जेफ्रि एपिस्टनची गुन्हेगारी वाटचालीवर प्रकाश टाकला. आज त्याच्या गुन्हेगारीचा सर्वाधिक फटका कोणकोणत्या देशाला बसला याविषयी आढावा घेणार आहोत. तसेच त्याच्या जाळयात किती उद्योगपती व राजकीय नेते अडकले ? यावर प्रकाश टाकणार आहोत. एपस्टीन फाईलचा सर्वाधिक फटका युरोपला बसला. २००८ मध्ये जेफ्रि एपस्टीनला लैंगिक गुन्हा केल्या प्रकरणी शिक्षा झाल्यानंतरही एपस्टिनशी मैत्री ठेवल्यामुळे अनेक देशाचे नेते अडचणीत आले. आतापर्यंत १० देशात १५ हुन अधिक नेत्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. ब्रिटन – १ ) प्रिन्स अँड्रयू राजा चार्ल्सचा भाऊ, १८ फेब्रु. २०२६ रोजी अटक, त्याचे…
दीपक मोहिते, एपस्टीन फाईल ( भाग क्र. १ ) एपस्टीन फाईल ; अनेकांचे चेहरे समोर येणार… *जेफ्रि एपस्टीन हा आज आपल्यात हयात नाही. त्याने १० ऑगस्ट २०१९ मध्ये मॅनहॅटन तुरुंगात आत्महत्या केली. जर त्याने आत्महत्या केली नसती तर त्यांची हत्याच झाली असती. *२० जाने. १९५३ साली त्याचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्याचे वडील एका पार्क डिपार्टमेंटमध्ये माळी होते. त्यामुळे जेफ्रिचे शिक्षण अर्धवट राहीले.* *१९७३ मध्ये त्याने डाल्टन स्कुलमध्ये गणित व भौतिक शास्त्राचा शिक्षक म्हणून काम केले. या शाळेत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांमुळे वॉल स्ट्रीटवर असलेल्या बिअर स्ट्रीम्स या बँकेत त्याला नोकरी मिळाली. सन १९८२…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” …आता सुशिक्षित तरुणांनी पुढे यायला हवे, वसई व नालासोपारा मतदारसंघाच्या मतदारांनी गेल्यावर्षी न भूतो न भविष्यती असे परिवर्तन घडवून आणले, त्यानंतर झालेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच मतदारांनी बहुजन विकास आघाडी व भाजपला ५७ व ४३ % जागा निवडून दिल्या. ( बहुजन विकास आघाडी – ७१, भाजप – ४३ व शिवसेना शिंदे गट- ०१ ) पण हे दोन्ही पक्ष मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू शकले नाहीत. गेल्या आठ महिन्यात या महानगरपालिकेत सध्या जे काही चालले आहे. त्यावरून हे दोन्ही पक्ष मतदारांच्या मनातून साफ उतरले आहेत. या दोन्ही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहेत.…
