- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, भाजप,पालघर विधानसभेसाठीही आग्रही, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नालासोपारा,विक्रमगड व डहाणू भाजपला तर वसई,पालघर व बोईसर शिंदे गटाला समसमान जागा,असे सूत्र ठरले असताना भाजप पालघरसाठी आता आग्रही आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेतले होते.त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला दोनच जागा देऊ पाहत आहे.त्यांच्या सर्व्हेनुसार पालघर विधानसभा शिंदे गटाला जिंकता येणे शक्य नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी,असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वापार बालेकिल्ला असून केवळ २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता येथे झालेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जम्मू – काश्मीर निवडणूक ; जगाचे लक्ष लागले आहे, जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा येत्या १८ सप्टें.रोजी पार पडणार आहे.या विधानसभेच्या एकूण ९० जागासाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.तर ४ ऑक्टो.रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे अनुक्रमे २५ सप्टें.व १ ऑक्टो.रोजी होणार आहे.या निवडणुकीत सुमारे ८७ लाख ९० हजार मतदार आपला हक्क बजावतील.या विधानसभेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षानंतर होत आहेत.सध्या या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे.या राज्याच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते,त्यानंतर आयोगाने या राज्यासह हरयाणा राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…
दीपक मोहिते, एसटी कामगारांचा संप ; आगारे ओस पडली,लोकांचे अतोनात हाल, ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर राज्यातील ८० हजार एसटी कामगारांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.आठ दिवसापूर्वी एसटी कामगारांचा संप होणार असल्याचे जाहीर होऊनही राज्य सरकारने कोणतीही हालचाल केली नाही.त्यामुळे गणपतीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज अतोनात हाल झाले. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या एसटी संपाला चिथावणी देणाऱ्या महायुतीच्या नेत्यावर एकप्रकारे काळाने सूड उगवला आहे.या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे आज अतोनात हाल झाले.आजच्या या संपामुळे राज्यातील ८० % एसटी आगारे ओस पडली असून एकूण ८० हजार कामगारापैकी ६७ हजार कामगार या संपात सामील झाले आहेत.गुणरत्ने सदावर्ते यांची एकमेव संघटना वगळता अन्य सर्व…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” २०२९ साली ” एक देश,एक निवडणूक,” संकल्पना अस्तित्वात येण्याची शक्यता ? ” एक देश,एक निवडणूक,” हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे.गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आपल्या भाषणात ” एकत्रित निवडणुका,” घेण्याचा आपला मनोदय व्यक्त केला.त्यामुळे २०२९ च्या निवडणुका या एकत्रित निवडणूक पद्धतीने होतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी निवडून येण्यापूर्वी २०१३ साली अशी मागणी केली होती.वेगवेगळ्या निवडणुका घेण्यात होणारा प्रचंड खर्च व विकसकामामध्ये निर्माण होणारे अडथळे व संसाधनांचा अपव्यय,अशी तीन महत्वाची कारणे,त्यांच्या या मागणीमागे होती. त्यांच्या या मागणीनंतर या विषयावर अनेक समित्या नेमण्यात आल्या,पण त्यातून काहीही निष्पन्न…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” आपला दवाखाना,” व ” शासन आपल्या दारी,” दोन्ही उपक्रम शासनकर्त्यांच्या विस्मरणात, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर तीन इंजिनच्या सरकारने गेल्या तीन महिन्यात राज्याच्या विकासासाठी हजारो कोटी रु.आणल्याचे जाहीर केले.पण हा निधी जातो कुठे ? त्या निधीचा वापर कोणत्या विकासकामांवर होतो,याचा थांगपत्ताही लागत नाही.जाहीर केलेला निधी हा नक्की राज्य सरकारला मिळतो कि या फक्त तोंडाच्या वाफा असतात. आज पण शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून १४ हजार कोटी रु.तर डिजिटल प्रकल्पासाठी २० हजार ८१७ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे वृत्त आताच प्रसिद्ध झाले आहे.हा निधी केवळ रस्तेबांधणी ( या कामात टक्केवारी मिळते ) व इन्व्हेंट ( यामध्ये सरकारची बिघडलेली प्रतिमा…
दीपक मोहिते, पापाचा घडा भरणार, शिखर बँक आर्थिक घोटाळा ; अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे.एकीकडे अनेक सहकारी पक्ष सोडून शरद पवार गटात सामील होत आहेत,दुसरीकडे भाजपमध्ये अजित पवार गटाची ” संगत नको रे बाबा,” असा सूर आळवणारा एक मोठा गट सक्रिय झाला आहे.त्यामुळे अजित पवार यांची स्थिती ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनाक्रम लक्षात घेता,” नियती कधीच कोणाला सोडत नाही,” असेच खरं म्हणावे लागेल. शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रु.घोटाळ्याच्या प्रकरणाने आता पुन्हा डोकं वर काढले आहे. शिखर बँक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तुतारी,घड्याळाची टिक,टिक बंद करणार का ? अजित पवार गटाच्या घडाळ्याची टिक टिक तुतारीच्या गगनभेदी आवाजामुळे बंद होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अजित पवार गटातील अनेकजण भिंतीवरील घड्याळ दूर सारून त्याच्या जागी तुतारी लटकवण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातील अनेक आमदार व पदाधिकारी महायुतीत आपल्यावर होणाऱ्या टीकेमुळे नाराज असून त्यांना शरद पवार यांची साथ सोडल्याचा आता पश्चाताप होऊ लागला आहे.समरजीत घाटगे हे भाजपचे व तर अन्य काही पदाधिकारी अजित पवार गटाचा त्याग करून शरद पवार गटात सामील झाले आहेत.आता ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील अंतर्गत धुसफुसीला कंटाळले असून लवकरच ते तुतारी हाती घेण्याच्या…
दीपक मोहिते, सूर्यातीर, गडकिल्ल्याचे संवर्धन ही काळाची गरज, पालघर जिल्हा हा निसर्गरम्य समुद्रकिनारा,हिरवेगार बागायती,शेती व पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.या व्यतिरिक्त जिल्ह्यातील गडकिल्ले व कोट,हे पर्यटक व गिर्यारोहकांची आकर्षणे आहेत.दरवर्षी पावसाळ्यात अनेक गिर्यारोहक हे गडकिल्ले व कोट सर करण्यासाठी आवर्जून येत असतात.पण यापैकी अनेक गडकिल्ल्याची दुरावस्था झाली आहे.आजवर संबधित विभागाने या गडकिल्ल्याच्या संवर्धनाकडे लक्ष दिले नाही,त्यामुळे अनेक गडकिल्ले नामशेष होण्याच्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळतात. जिल्ह्यात आजच्या घडीला ५० हुन अधिक गडकिल्ले आहेत.त्यामध्ये आशेरी,असावा,कोहोज, काळदुर्ग,शिरगाव,कामण, टकमक,वज्रगड,गंभीर, भूपतगड,मंदाग्नी किल्ला,बल्लाळ गड,तारापूर,दांडा,डहाणू किल्ला,अर्नाळा,वसई किल्ला,केळवे,उतवड, तांदुळवाडी,पारगाव कोट,दातीवरे कोट,कोरे कोट,सरतोडी कोट,मथाने कोट,चटाळे कोट,एडवण व खटाळे व १५ ते २० गड, किल्ले व कोट यांचा समावेश आहे.हा ऐतिहासिक…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” धादांत खोटे बोलणारे फडणवीस साहेब,महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल धादांत खोटे बोलले.विरोधी पक्षाचे याप्रश्नी सरकारला खिंडीत पकडणे व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला दगाफटका होईल,अशा भितीमधून फडणवीस हे सध्या बावचळले असून ते एकामागोमाग बेलगाम वक्तव्ये करत सुटले आहेत. काल फडणवीस हे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते पहा,काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले,जवाहरलाल नेहरू यांच्या ” डिस्कव्हरी ऑफ इंडिया ,” या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरण्यात आली आहे,त्याविषयी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे.त्यांचेहे वक्तव्य धादांत खोटं असून या पुस्तकात ते म्हणतात तसा…
दिपक मोहिते, फ्रंटलाईन, आमच्या अपेक्षा पूर्ण होणार का ? पालघर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद,ही दोन महत्वाची कार्यालये नव्या वास्तूमध्ये स्थलांतरीत होऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली.या वास्तूमधून सर्वसामान्य नागरिक, आदिवासी,शेतकरी व समाजातील विविध घटकांना दिलासा मिळू शकेल,असे कामकाज होईल,अशी अपेक्षा होती.त्या कितपत पूर्ण झाल्या याबाबतचा लेखाजोगा मांडण्याची गरज वाटली म्हणून हा लेखप्रपंच.जिल्हा प्रशासनाचा आजवरचा अनुभव अत्यंत कटू असल्यामुळे जिल्हावासीयांनीही प्रशासनाकडून फारशा अपेक्षा बाळगल्या नव्हत्या.नवा जिल्हा अस्तित्वात आल्याच्या घटनेला गेल्या महिन्यात एक दशक पूर्ण झाले.सुरुवातीच्या काळात मुख्यालयासाठी स्वतःची वास्तू नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणी भेडसावत होत्या.पण शासनाने पालघर शहरात जिल्हा प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी भव्य-दिव्य वास्तू उभारली. गेल्या सात वर्षात जिल्हा…
