- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
सुलभा रानडे,रत्नागिरी, मिरकरवाडा बंदरातील ३०० अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा, जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर परिसरात फोफावलेल्या अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे.बंदराच्या विकासाच्या कामात अडथळा येऊ नये,यासाठी संबधित व्यक्तींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिरकरवाडा बंदराच्या ११ हे.जमिनीवर कोट्यवधी रु.खर्च करून बंदर नव्याने विकसित करण्यात येत आहे.नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या सुसज्ज अशा या बंदरात ३०० ट्रॉलर्स व २०० पर्ससीन नौका,अशा एकूण ५०० नौका उभ्या राहू शकतील.या बंदराच्या विकासासाठी आर्थिक निधीही मंजूर करण्यात आला आहे.त्यासाठी आवश्यक ती जमीन मोकळी करून देणे आवश्यक आहे.सध्या या जमिनीवर ३०० हुन अधिक अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत.त्यामध्ये माशांची जाळी,नौकाचे सामान,सुकी मच्छी,तसेच माशांची खरेदी-विक्री केंद्र याचा…
नवीन पाटील,सफाळे, बोईसर येथे पांचाळ महिला मंडळातर्फे कॅन्सर विषयक मार्गदर्शन, बोईसर महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब ऑफ बोईसर,डॉ. सोनम खंदेजोड यांनी उपस्थित महिलांना ब्रेस्ट कँसर विषयी विशेष माहिती देऊन मार्गदर्शन केले. पौष महिन्यात येणारी संक्रात ही लहान मुलं,नवं वधू-वर तसेच महिला वर्गासाठी एकमेकांच्या भेटीची,दागिने घालून नटण्याची व तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत आनंद साजरा करण्याची संधी घेऊन येत असते. मैत्री व स्नेहपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी संक्रातीच्या निमित्ताने एकमेकींना वाण देण्याची प्रथा देखील आपल्या कडे आहे.हीच प्रथा कायम ठेवत,आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष व कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता याबद्दल महिलांमध्ये जागृती…
अनिल वैद्य,नाशिक, नाशिक येथे भारतीय लष्कराचे सामर्थ्य दाखवणारी प्रात्यक्षिके, भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या देवळाली यांच्या फायरिंग रेंजमध्ये विविध लक्ष्यावर अचूक निशाणा साधत शत्रूच्या वरात धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन घडवले.भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचा भाग असलेल्या तोफखाना दलाचे प्रात्यक्षिके आज नाशिक मधील देवळाली फायरिंग रेंजमध्ये झाली.अतिविशिष्ट सेवा मेडल प्राप्त कमांडेड स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल नवनीतसिंह सरना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तोफखाना दलाच्या विविध लक्ष्यावर अचूक मारा करत आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले.या प्रात्यक्षिकात लष्करात कार्यरत असलेल्या चित्ता चेतक या हेलिकॉप्टर्स तसेच नाईन पॅराशुट फिल्ड रेजिमेंटच्या पॅरोट सहभागी झाले होते.या प्रात्यक्षिकाबरोबर फायरिंग रेंजच्या परिसरात तोफा आणि विविध…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” संपवून आता कामाला लागा…. विधानसभा निवडणूक होऊन आता दोन महिन्याचा काळ लोटला आहे.” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” संपवून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी कामाला लागायला हवे.आतापर्यंत सत्कार व सोहळे उदंड झाले,निवडणुकीच्या काळात आपण रयतेला जी आश्वासने दिली,त्याची पूर्तता करण्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या कारभारावर ताशेरे ओढत आपण निवडून आलो,आता आपली जबाबदारी आहे की आपण जी आश्वासने रयतेला दिली,त्याला आता न्याय दिला पाहिजे. पालघर जिल्हा हा सर्वसमावेशक,असा जिल्हा आहे.या जिल्ह्यात आदिवासी,कुणबी,आगरी,भंडारी,कोळी-मांगेला, ख्रिस्ती,गुजराती,उत्तर भारतीय व अन्य समाज, असे अठरापगड जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षे राहत आहेत.२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने पालघर जिल्हा…
दीपक मोहिते, न्यायव्यवस्था कासवाच्या गतीने, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; ” पुन्हा ये रे माझ्या मागल्या,” राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार ? याविषयी राज्यातील जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना,ही सुनावणी आज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.आता ही सुनावणी २८ जाने.रोजी होण्याची शक्यता आहे.अचानक झालेल्या बदलामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.राज्यातील २६ महानगरपालिका,२५७ महापालिका,२६ जिल्हा परिषदा व २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रभाग रचना,लोकसंख्येत १० % वाढ धरून निश्चित करण्यात आलेली सदस्यसंख्या व ओबीसी आरक्षण यावरून सर्वोच्च न्यायालयात तब्बल ५७ निरनिराळ्या याचिका दाखल आहेत.त्या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होती.मात्र आज…
वाड्यातील शेतकऱ्यांच्या संसारात तिखट मिरचीने आणलाय गोडवा बागूल कुटुंबीय घेतात १५ वर्षांपासून मिरची लागवडीतून ठोस उत्पन्न वाडा तालुक्यातील कोंढले येथील शेतकरी संजय बाळकृष्ण बागूल यांनी आपल्या २ एकर जागेत तिखट मिरचीची लागवड केली आहॆ.खर्च वगळता चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी त्यात सातत्य राखले आहे.गेले १५ वर्षांपासून बागुल कुटुंबीय तिखट मिरचीची लागवड करीत आहेत.या तिखट मिरचीने शेतकरी संजय बागूल या शेतकऱ्याच्या संसारात गोडवा आणला असून एकरी एक ते दीड लाख रु.निव्वळ नफा मिळवत आहेत. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाड्याचा तांदूळ हा ” वाडा कोलम,” या नावाने जगप्रसिद्ध आहे.असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबून आहे.तसेच मजुरांचा तुटवडा,खते,बी-बियाणे,…
वसंत भोईर,वाडा, ई-पिक पाणी न झाल्याने केंद्रावर भात घेण्यास नकार, वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात बारा उताऱ्यावर ई-पीक पाणी,अशी नोंद न केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे भात आदिवासी विकास महामंडळाने घेण्यास नकार दिला आहॆ.ज्या शेतकऱ्यांनी केंद्रावर भात जमा केला आहे.तो भात परत घेऊन जाण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहॆ.भात पडून राहणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.या तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रांवर विविध वाणांची लागवड केली जाते.भात तयार झाल्यावर राज्य शासनातर्फे ई-पीक पाणी लावण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केले नाही.काही शेतकरी अशिक्षित असल्याने शेतावर जाऊन शेताचे फोटो काढणे,अँप डाऊनलोड करणे,रेंज…
अनंत भोईर,पालघर, राष्ट्रीय जलजीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालकांनी दोन गावांची केली पहाणी, राष्ट्रीय जल जीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालक,जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार व राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रन यांनी पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत गांजे- ढेकाळे व डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत तवा या गावातील पेठ जलजीवन मिशन योजनेच्या कामाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी करून सरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व गावकरी,यांच्याशी संवाद साधून योजनेचे महत्व पटवून दिले. प्रत्येक कुटूंबाला ५५ लिटर प्रति व्यक्ती शुद्ध नियमित पाणी पुरवठा करणे,आवश्यक आहे.यासाठी योजना पुर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीने नियोजन करून योजनेचे…
अनंत भोईर,पालघर, पालघर येथे उद्योजकांसाठी जिल्हा उद्योगमित्र समिती सभेचे आयोजन, राज्यात उद्योगधंद्याचे विकेंद्रिकरण व उद्योगधंद्यासाठी संतुलीत वाढ हा राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणांचा मुख्य गाभा आहे.राज्यामधील गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. उत्सुक उद्योजकांना विविध प्रकारचे संविधानिक परवाने, वीज,आर्थिक सहाय्य,इ. मिळवण्याकरीता प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे.त्यास अनुसरुन जिल्ह्यातील पालघर-तारापूर, वाडा,डहाणू,तलासरी, विक्रमगड,जव्हार-मोखाडा,या तालुक्यातील उद्योजकांसाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता सर्व विशेष जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेचे आयोजन उद्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोळगांव,जि.पालघर येथे करण्यात आले आहे.सदर सभेस उद्योग व्यवसायाशी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी,पोलीस विभाग,एमपीसीबी, एमआयडीसी,औद्योगिक सुरक्षा,कामगार,महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग ( जि.प. ),अग्रणी बँक,इ. विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिसरातील औद्योगिक संघटना,उद्योजक,…
शुभम सावंत,विरार, मनपा मुख्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न,२६ जाने.पर्यंत प्रदर्शन खुले राहणार, वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ” मी स्वच्छ अभियानामध्ये सहभागी होईन,आपले शहर स्वच्छ ठेवीन,” असे घोषवाक्य देण्यात आले होते. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन फित कापून केले आणि काढण्यात आलेल्या रांगोळ्यांची पाहणी केली. यावेळी समाजात सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्या होत्या.महाराष्ट्र राज्यात वाढती दहशत,महिलांवर वाढते अत्याचार, शहरातील दूषित प्रदूषण, झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल,पाण्याचा वाढता दुरुपयोग,वाढते आजार,शहरातील अस्वच्छ ठिकाणे,अशा रांगोळ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू…
