अनंत भोईर,पालघर,
राष्ट्रीय जलजीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालकांनी दोन गावांची केली पहाणी,
राष्ट्रीय जल जीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालक,जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार व राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रन यांनी पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत गांजे- ढेकाळे व डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत तवा या गावातील पेठ जलजीवन मिशन योजनेच्या कामाची नुकतीच पाहणी केली.
यावेळी त्यांनी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी करून सरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व गावकरी,यांच्याशी संवाद साधून योजनेचे महत्व पटवून दिले.
प्रत्येक कुटूंबाला ५५ लिटर प्रति व्यक्ती शुद्ध नियमित पाणी पुरवठा करणे,आवश्यक आहे.यासाठी योजना पुर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीने नियोजन करून योजनेचे देखभाल करण्यासाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे. प्रत्येक घराला नळजोडणी करणे,शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी गावातच जैविक व रासायनिक फिल्ड किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्तेची तपासणी करणे, नियमित पाणीपट्टी वसूली करणे आदी कामे करणे आवश्यक आहे,अशा सूचना त्यांनी दिल्या.
भेटी दरम्यान पाण्याच्या स्त्रोतांची विहीरी,साठवण टाकी,वितरण वाहिनी व गावातील योजने अंतर्गत जोडणी केलेल्या कुटुंबाना भेट दिली.तसेच शाळा व अंगणवाडी येथे भेट देवून तेथील परिसर स्वच्छता, पाणी उपलब्धता पाणी करून विद्यार्थ्यांना आपल्या घरात शौचालय व पाणी उपलब्ध विषयी संवाद साधला.तसेच ग्रामपचायतीला देण्यात आलेल्या जैविक व रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्ता तपासणी करीता निवडलेल्या महिलांशी चर्चा करण्यात आली.
सदर पहाणीच्या वेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता प्रवीण भावसार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा,राजेश पाध्ये, गटविकास अधिकारी पंचायत समिती पालघर,बापूराव नाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे पं.स. पालघर,(उप अभियंता ग्रामीण पाणी पाणीपुरवठा उप विभाग पालघर, बी.के.शिंदे, ( शाखा अभियंता,संतोष शिरशीकर,सचिन सुरूम ( शाखा अभियंता प.स. तलासरी ) विनोद पाटील विस्तार अधिकारी ( पंचायत ), जिल्हा स्तरीय स्वच्छ भारत अभियान कक्षाचे आत्माराम विशे,संजय ठाकरे,मानसी वर्तक,पालघर व डहाणू पंचायत समिती चे अधिकारी व बिआरसी,सिआरसी, इंजिनीयर यांचे सह कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

