अनंत भोईर,पालघर,
पालघर येथे उद्योजकांसाठी जिल्हा उद्योगमित्र समिती सभेचे आयोजन,
राज्यात उद्योगधंद्याचे विकेंद्रिकरण व उद्योगधंद्यासाठी संतुलीत वाढ हा राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणांचा मुख्य गाभा आहे.राज्यामधील गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. उत्सुक उद्योजकांना विविध प्रकारचे संविधानिक परवाने, वीज,आर्थिक सहाय्य,इ. मिळवण्याकरीता प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे.त्यास अनुसरुन जिल्ह्यातील पालघर-तारापूर, वाडा,डहाणू,तलासरी, विक्रमगड,जव्हार-मोखाडा,या तालुक्यातील उद्योजकांसाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता सर्व विशेष जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेचे आयोजन उद्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोळगांव,जि.पालघर येथे करण्यात आले आहे.सदर सभेस उद्योग व्यवसायाशी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी,पोलीस विभाग,एमपीसीबी, एमआयडीसी,औद्योगिक सुरक्षा,कामगार,महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग ( जि.प. ),अग्रणी बँक,इ. विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या परिसरातील औद्योगिक संघटना,उद्योजक, नवउद्योजक यांनी सदर सभेस उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना केले आहे.

