नवीन पाटील,सफाळे,
बोईसर येथे पांचाळ महिला मंडळातर्फे कॅन्सर विषयक मार्गदर्शन,
बोईसर महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब ऑफ बोईसर,डॉ. सोनम खंदेजोड यांनी उपस्थित महिलांना ब्रेस्ट कँसर विषयी विशेष माहिती देऊन मार्गदर्शन केले.
पौष महिन्यात येणारी संक्रात ही लहान मुलं,नवं वधू-वर तसेच महिला वर्गासाठी एकमेकांच्या भेटीची,दागिने घालून नटण्याची व तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत आनंद साजरा करण्याची संधी घेऊन येत असते.
मैत्री व स्नेहपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी संक्रातीच्या निमित्ताने एकमेकींना वाण देण्याची प्रथा देखील आपल्या कडे आहे.हीच प्रथा कायम ठेवत,आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष व कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता याबद्दल महिलांमध्ये जागृती व्हावी,यासाठी स्तनाच्या कॅन्सरविषयी माहितीचे वाण देत,या रोगाची कारणे,लक्षणे व त्यावर उपचार पद्धती याबाबत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोईसर,पास्थळ चिंचणी,डहाणूमधील महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.तसेच रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिलांना परिपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी ब्रेस्ट कॅंसर रोगनिदान शिबिरात तपासणीसाठी अनेक महिलांनी आपले तपासणी अर्ज सादर केले.

