अनिल वैद्य,नाशिक,
नाशिक येथे भारतीय लष्कराचे सामर्थ्य दाखवणारी प्रात्यक्षिके,
भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या देवळाली यांच्या फायरिंग रेंजमध्ये विविध लक्ष्यावर अचूक निशाणा साधत शत्रूच्या वरात धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन घडवले.भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचा भाग असलेल्या तोफखाना दलाचे प्रात्यक्षिके आज नाशिक मधील देवळाली फायरिंग रेंजमध्ये झाली.अतिविशिष्ट सेवा मेडल प्राप्त कमांडेड स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल नवनीतसिंह सरना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तोफखाना दलाच्या विविध लक्ष्यावर अचूक मारा करत आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले.या प्रात्यक्षिकात लष्करात कार्यरत असलेल्या चित्ता चेतक या हेलिकॉप्टर्स तसेच नाईन पॅराशुट फिल्ड रेजिमेंटच्या पॅरोट सहभागी झाले होते.या प्रात्यक्षिकाबरोबर फायरिंग रेंजच्या परिसरात तोफा आणि विविध शस्त्रसाहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रात्यक्षिकाच्या प्रसंगी भारताचे मित्र राष्ट्र असलेले नेपाळ तिबेट,म्यानमार,श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका खंडातील काही राष्ट्रांचे सैन्य अधिकारी उपस्थित होते.शिवाय विविध मूलकी सेवेतील अधिकारी या प्रात्यक्षिकासाठी हजर होते.

