- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी, नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयामुळे तलासरीच्या विकासाला वेग, तलासरी नगरपंचायतीचे कार्यालय तहसील कार्यालया च्या जुन्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना,नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये म्हणाले,नगर पंचायत कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे आता जागेची अडचण संपून कामाला वेग येणार आहॆ.नगर पंचायतीतर्फे अनेक विकासाची कामे करण्यात येत असून,तलासरी नगर पंचायतीचा विकास आराखडा मंजूर झाल्यास तलासरीच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन नगर पंचायतीच्या कार्यालय उदघाटन कार्यक्रमांस तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक विजय मूतदक,माजी आमदार श्रीनिवास वनगा, मुख्याधिकारी भूषण माने, जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा,तसेच उद्योजक अजित नार्वेकर तसेच नगर सेवक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याधिकारी भूषण माने…
अनंत भोईर,पालघर, उत्कृष्ठ काम करणाऱ्या कुटूंबाचा सत्कार, स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.स्वच्छतेच्या सुविधांचा नियमित वापर व देखभाल करून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ करण्याच्या उद्देशाने “ स्वच्छ माझे आंगण,” अभियान जिल्ह्यातील ८९८ गावांमध्ये राबवण्यात आले. यामध्ये वैयक्तिक शौचालय,शोषखड्डा अथवा परसबाग,कंपोस्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या वापर करणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांना उत्कृष्ट कुटुंब म्हणून प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्व गावांत दृश्यमान स्वच्छता…
सचिन परब,विरार पूर्व, भाताणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न भाताणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात माजी आमदार राजेश पाटील यांचा महत्त्वाचा पाठपुरावा असून या कामांना सुरुवात झाली आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश बाडगा,उपसरपंच हेमराज कासार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार,ग्रामपंचायत सदस्य योगेश कडू,बबन नामकुडा, मंगळ भोये,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजना सायरे,तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आ.राजेश पाटील आपल्या भाषणात. म्हणाले, “ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळवून आणण्यावर भर दिला…
संजय लांडगे,वाडा, वाडा येथे शेतकरी,प्रात्यक्षिक माहिती,प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर संपन्न, कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी शिबीर,प्रात्यक्षिक माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर,नुकतेच वाडा तालुक्यातील मौजे मालोंडे येथील कृषी पर्यटन केंद्र वैतरणा रिव्हर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सन्माननीय संदिप पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती वाडा,च्या सभापती अस्मिता लहांगे या होत्या. या तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० पशुपालक सहभागी झाले होते.यावेळी प्रशिक्षणामध्ये विविध विषयावरील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व…
दिपक मोहिते, अत्यंत विदारक चित्र, बीड जिल्ह्याचा सांस्कृतिक चेहरा पार काळवंडला गेला, बीड जिल्ह्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव,हे एकेकाळी डोळे दिपवून टाकणारे होते.आज त्या जिल्ह्याचा बिहार झाल्याची टीका होत आहे.चारी बाजुंनी होणारी ही टीका बिडवासीयांच्या जिव्हारी लागणारी अशीच आहे.ज्या जिल्ह्यात अनेकांची कुलदेवता असणारी योगेश्वरी देवी,वैजनाथाचे मंदिर,मन्मथस्वामी मंदिर,थोर अभ्यासक भास्कराचार्य,आद्यकवी मुकुंदराज,दासोपंत, भगवानबाबा,अशा संत व गुरु यांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक व पौराणिक बीड जिल्ह्याचे वैभव राज्यकर्त्यांनी पार धुळीला मिळवले. भाजपचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी बीड जिल्ह्याला राज्याच्या राजकीय नकाशावर आणले.त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्यापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची बीजे रोवली गेली. वाळूतस्करी,खंडणी,हत्या, टोळीयुद्ध,राखेची तस्करी, ऊसतोड कामगारांची पिळवणूक,इ.घटनामध्ये बेसुमार वाढ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” कॉमन मॅन,” ते ” डेडिकेटेड कॉमन मॅन,” एक असह्य व जीवघेणा प्रवास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका जाहीर सभेत म्हणाले, ” मी यापूर्वी कॉमन मॅन म्हणजे सीएम होतो,आता डेडीकेटेड कॉमन मॅन म्हणजे डिसीएम झालो. त्यांच्यावर हा जो असह्य प्रवास करण्याची पाळी आली आहे,ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणली.त्यामुळे शिंदे महाशयानी सध्या अमित शहा पुराण वाचणे बंद केले आहे.तसेच त्यांच्या दिल्ली वाऱ्याही आता थांबल्या आहेत.उठसुठ मोदी व शहा यांचे गोडवे गाणारे कॉमन मॅन आता डेडिकेटेड कॉमन होऊन आपल्या दरे गावात आपल्या शेतीमध्ये माती परीक्षण करताना पाहायला मिळत असतात. आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक योजना यशस्वीपणे…
नदीम शेख,पालघर, पालघर पंचायत समितीवर श्रमजीवीने काढला मोर्चा, गेल्या काही वर्षांपासून पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे श्रमजीवी संघटनेने पालघर पंचायत समितीवर मोर्चा नेला. यावेळी मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून ” हर घर नलसे जल, ” ही योजना संपूर्ण भारतभर जनजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामाध्यमातून राबवण्यात येत असून सदरच्या योजना अद्याप पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.तरी जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही आस्थापनांचे संबधित सर्व ठेकेदार व पाणी पुरवठा अधिकारी तसेच सर्व ग्रामसेवक यांनी याबाबत सर्व नागरिकांना या योजनेची माहिती द्यावी,तसेच प्रत्येक…
जव्हार,प्रतिनिधी, जव्हार – कासटवाडी येथे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न, जव्हार कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या पुढाकाराने आज जाधवपाडा येथे भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सुमारे २५० हुन अधिक महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमा दरम्यान महिलांनी एकत्र येत परंपरागत हळदीकुंकवाचा सण साजरा केला आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत,उपसरपंच त्रिंबक रावते,सदस्य कुणाल रावते,नितीन चौधरी,शंकर इल्हात तसेच कल्याणी राऊत, मोनिका खिरारी,सुचिता होळकर आणि गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित…
सुशील भोईर,वसई, वसई येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर,” चे लोकार्पण, प्बोईसरचे माजी आ.राजेश पाटील यांच्या हस्ते फादरवाडी,गोखिवरे येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर” या अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या आरोग्यमंदीराने स्थानिक नागरिकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस,वॉर्डबॉय,आशा सेविका तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत उभारलेल्या या आरोग्यमंदीरामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी राजेश पाटील आपल्या भाषणात म्हणाले , हे आरोग्यमंदीर स्थानिकांसाठी आधार ठरणार आहॆ. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.चव्हाण,डॉ.धनंजय आणि सर्व उपस्थित अधिकारी…
अनंत भोईर,पालघर, जिल्हा परिषद पालघर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, जिल्हा परिषद पालघर,येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,उपाध्यक्ष पंकज कोरे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर,कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, जि.प.सदस्य सारिका निकम, आशा चव्हाण,नीलिमा भोवर, शीतल धोडी,लतिका बालसी,भावना विचारे,पूर्णिमा धोडी,जयेंद्र दुबळा,कृष्णा माळी,हबीब शेख,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रूपाली सातपुते,सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी…
