सचिन परब,विरार पूर्व,
भाताणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
भाताणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात माजी आमदार राजेश पाटील यांचा महत्त्वाचा पाठपुरावा असून या कामांना सुरुवात झाली आहे.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच हितेश बाडगा,उपसरपंच हेमराज कासार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार,ग्रामपंचायत सदस्य योगेश कडू,बबन नामकुडा, मंगळ भोये,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजना सायरे,तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी आ.राजेश पाटील आपल्या भाषणात. म्हणाले, “ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळवून आणण्यावर भर दिला जात आहे.विकासकामांच्या माध्यमातून भाताणे गावाला आदर्श गाव बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.”

