जव्हार,प्रतिनिधी,
जव्हार – कासटवाडी येथे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न,
जव्हार कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या पुढाकाराने आज जाधवपाडा येथे भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात सुमारे २५० हुन अधिक महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमा दरम्यान महिलांनी एकत्र येत परंपरागत हळदीकुंकवाचा सण साजरा केला आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत,उपसरपंच त्रिंबक रावते,सदस्य कुणाल रावते,नितीन चौधरी,शंकर इल्हात तसेच कल्याणी राऊत, मोनिका खिरारी,सुचिता होळकर आणि गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण व सामाजिक एकतेसाठी असा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

