सुरेश काटे,तलासरी,
नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयामुळे तलासरीच्या विकासाला वेग,
तलासरी नगरपंचायतीचे कार्यालय तहसील कार्यालया च्या जुन्या इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर नगर पंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना,नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये म्हणाले,नगर पंचायत कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे आता जागेची अडचण संपून कामाला वेग येणार आहॆ.नगर पंचायतीतर्फे अनेक विकासाची कामे करण्यात येत असून,तलासरी नगर पंचायतीचा विकास आराखडा मंजूर झाल्यास तलासरीच्या विकासाला वेग येणार आहे.
नवीन नगर पंचायतीच्या कार्यालय उदघाटन कार्यक्रमांस तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक विजय मूतदक,माजी आमदार श्रीनिवास वनगा, मुख्याधिकारी भूषण माने, जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा,तसेच उद्योजक अजित नार्वेकर तसेच नगर सेवक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी भूषण माने यांनी जुन्या नगर पंचायतीच्या कार्यालयातील अपुऱ्या जागे मुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत होता.त्यामुळे तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये गेल्यामुळे तहसीलच्या जुन्या इमारतीत नगर पंचायत कार्यालय आल्यामुळे जागेची अडचण कमी होऊन सर्व विभाग एकाच ठिकाणी काम करणार असल्याने कामाला वेग येणार आहॆ,तसेच विकास आराखडा मंजूर झाल्यास तलासरी नगर पंचायत चे स्वतंत्र इमारत बांधता येणार आहे.सध्याची इमारत पाच वर्षाच्या भाडे कराराने नगर पंचायतील दिली आहे, विकास आराखडा लवकर मंजूर करण्यास लोक प्रतिनिधिनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन मुख्याधिकारी भूषण माने यांनी केले.तसेच तहसील कार्यालय,बांधकाम विभाग, च्या अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य केल्याने नगर पंचायतील नवीन कार्यालय लवकर मिळाले,याबाबत त्याचे आभार मानले.

