नदीम शेख,पालघर,
पालघर पंचायत समितीवर श्रमजीवीने काढला मोर्चा,
गेल्या काही वर्षांपासून पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे श्रमजीवी संघटनेने पालघर पंचायत समितीवर मोर्चा नेला. यावेळी मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून ” हर घर नलसे जल, ” ही योजना संपूर्ण भारतभर जनजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामाध्यमातून राबवण्यात येत असून सदरच्या योजना अद्याप पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.तरी जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही आस्थापनांचे संबधित सर्व ठेकेदार व पाणी पुरवठा अधिकारी तसेच सर्व ग्रामसेवक यांनी याबाबत सर्व नागरिकांना या योजनेची माहिती द्यावी,तसेच प्रत्येक योजनेची गाव निहाय माहिती,योजना पूर्ण करून पाणी केव्हा मिळणार विषयीची माहीती द्यावी,अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.मोर्चामध्ये ग्रामीण भागातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

