सुशील भोईर,वसई,
वसई येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर,” चे लोकार्पण,
प्बोईसरचे माजी आ.राजेश पाटील यांच्या हस्ते फादरवाडी,गोखिवरे येथे “आयुष्यमान भारत आरोग्यमंदीर” या अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या आरोग्यमंदीराने स्थानिक नागरिकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमास आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस,वॉर्डबॉय,आशा सेविका तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत उभारलेल्या या आरोग्यमंदीरामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी राजेश पाटील आपल्या भाषणात म्हणाले , हे आरोग्यमंदीर स्थानिकांसाठी आधार ठरणार आहॆ.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.चव्हाण,डॉ.धनंजय आणि सर्व उपस्थित अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांचे माजी आ.राजेश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी त्यांच्या गोखीवरे माजी उपसरपंच किशोर वैती,माजी ग्रामपंचायत सदस्य कैशियन लोपिस,प्रकाश पाटील,अजित भोईर,रणधीर कांबळे,बविआ व युवा विकास आघाडीचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

