अनंत भोईर,पालघर,
जिल्हा परिषद पालघर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा,
जिल्हा परिषद पालघर,येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,उपाध्यक्ष पंकज कोरे,समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर,कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, जि.प.सदस्य सारिका निकम, आशा चव्हाण,नीलिमा भोवर, शीतल धोडी,लतिका बालसी,भावना विचारे,पूर्णिमा धोडी,जयेंद्र दुबळा,कृष्णा माळी,हबीब शेख,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रूपाली सातपुते,सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

