संजय लांडगे,वाडा,
वाडा येथे शेतकरी,प्रात्यक्षिक माहिती,प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर संपन्न,
कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी शिबीर,प्रात्यक्षिक माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क शिबिर,नुकतेच वाडा तालुक्यातील मौजे मालोंडे येथील कृषी पर्यटन केंद्र वैतरणा रिव्हर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सन्माननीय संदिप पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती वाडा,च्या सभापती अस्मिता लहांगे या होत्या.
या तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० पशुपालक सहभागी झाले होते.यावेळी प्रशिक्षणामध्ये विविध विषयावरील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व प्रत्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मा.डॉ.प्रशांत कांबळे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर,कृषी व विज्ञान केंद्र कोसबाड येथील कृषी तंत्रशास्त्रज्ञ भरत कुशारे,कृषी विकास अधिकारी पालघर माने,गटविकास अधिकारी वैभव शिंदे,यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षण मेळाव्यासाठी महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, जि.प.व ता.ल.प.चि.डहाणूचे सहा.आयुक्त डॉ.सिद्धार्थ साबळे,ता.ल.प.चि.पालघर सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष राऊत,डॉ.प्रणाली कुदळे,इ. अधिकारी उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.हेमंत कुलकर्णी सहाय्यक आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जित पोखरकर यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र आगिवले यांनी केले.

