- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
नवीन पाटील,सफाळे, सफाळे पोलिसांकडून विद्यार्थ्याना कायदेविषयक मार्गदर्शन, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियानातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुन्हे विषयक माहिती आणि त्यापासून सावधानता बाळगण्यासाठी सफाळे पोलीस ठाणे तर्फे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयात नुकतेच जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त गाव अभियानांतर्गत सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना नुकतेच सायबर क्राईम,आर्थिक गुन्हयाचे प्रकार,अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक,ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक,ओएलएक्स फसवणूक लैंगिक फसवणूक केवायसी फसवणूक डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक याच्यापासून सावधनता कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर सायबर हेल्पलाईन क्र.१९३० वर संपर्क साधण्याच्या सुचना देण्यात आल्या.…
अनिल वैद्य,नाशिक विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला आज भेट दिली.यावेळी विद्यापीठाच्या कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,अ.वि.से.प., वि.से.प.यांच्या समवेत विद्यापीठाच्या ” ग्रीन कॅम्पसची,” पहाणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या,विद्यापीठाचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने तो विलोभनीय झाला आहे.ग्रीन कॅम्पसमध्ये लावण्यात आलेली विविध प्रजातींच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राणी व पक्ष्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी आदर्श घ्यावा. विद्यापीठातर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क…
दीपक मोहिते, ” मिशन एकनाथ शिंदे,” एकनाथ शिंदे सध्या ” हाताची घडी,तोंडावर बोट, ” अशा भूमिकेत, भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार मिशन सुरू केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना त्यांच्यावर सोडले आहे.विविध आघाडीवर शिंदे यांची कोंडी करण्यात यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद गणेश नाईक यांना देऊन ” कडवटपणाचे वर्तुळ,” पूर्ण केले आहॆ. मुख्यमंत्रीपद,खातेवाटप, पालकमंत्रीपद वाटप,या सर्व प्रक्रियेत शिंदे यांना भाजपने चांगलाच दणका दिला.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांना देण्यात आल्यामुळे शिंदे प्रचंड नाराज झाले होते.ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात या दोघांमधून विस्तव जात नाही.मध्यंतरीच्या काळात गणेश नाईक हे गेल्या…
संजय लांडगे,वाडा, जवाहर नवोदय विद्यालयांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी- डॉ.सवरा, खा.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत नियम ३७७ अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन मागणीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.यावेळी खा.सवरा म्हणाले,मी स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे,या विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी माझा सतत संवाद असतो. संपूर्ण देशभरात ५९० नवोदय विद्यालये कार्यरत आहेत आणि येथे कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा,ही त्यांची जुनी आणि न्याय्य मागणी आहे. जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले स्वायत्त संस्थान आहे.येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्रीय नागरी सेवा ( पेन्शन ) नियम, १९७२…
सुरेश काटे,तलासरी खाजगी परीक्षाकेंद्रे बदलण्याची उमेदवारांची मागणी, पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा फेब्रु.व मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली आहॆ.या परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नेमणूक झाली असताना अधिकृत परीक्षा केंद्र न देता खाजगी केंद्रावर परीक्षा ठेवण्यात आली आहे. दुय्यम व कनिष्ठ अभियंता ही अत्यंत महत्त्वाची पदे असून त्यासाठी खाजगी गल्लीबोळात देण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थी ९०० ते १००० रु.फी भरून विद्यार्थी चार ते पाच वर्षे तयारी करतात आणि अशा प्रकारे परीक्षा केंद्र मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे…
” टग्या,” फंटर लंख्येने अधिकाऱ्यांच्या काढल्या चड्ड्या, बहुचर्चित वसई विरार शहर महानगरपालिकेची लक्तरे आता वेशीला टांगली गेली असून दररोज एकामागोमाग नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत.” खंडणी व वसुली,हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो तुम्हा करदात्यांच्या उरावर बसून मिळवणारच,” असे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोधवाक्य बनवले आहे.या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.एक वरीष्ठ अधिकारी नामे अनिककुमार भवार व परेश कनाले या दोघांनी गेल्या तीन वर्षात महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. वसई विरार उपप्रदेशात या दोघांचे खंडणीखोर फंटर्स यांनी हैदोस घातला आहे.त्यांच्याच एका फंटरने दोन दिवसांपूर्वी हे एका ऑडिओ क्लिपने सिद्ध करून दाखवले आहे.रोहन लंख्ये या फंटरने आपले वरीष्ठ वसुलीच्या पैशासाठी कसा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फोर्ब्सच्या यादीत भारताला पहिल्या दहामध्ये स्थान नाही, अमेरिका,चीन,रशिया,फ्रांस नंतर महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला यंदा फोर्ब्स – २०२५ यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळू शकलेले नाही.नेतृत्व,आर्थिक क्षमता,राजकीय शक्ती,लष्करी ताकद व आंतरराष्ट्रीय संबंध,या निकषावर आपला देश खरा उतरला नाही,त्यामुळे आपण बाराव्या क्रमांकावर फेकलो गेलो आहोत.या घडामोडीमुळे भारताला चांगलाच झटका बसला आहे. फोर्ब्सने जगातील शक्तिशाली राष्ट्राच्या नावाची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.अमेरिकेने भक्कम अर्थव्यवस्था ( ३०.३४ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – ३४.५ कोटी,) व लष्करी ताकद या बळावर आपले अव्वल स्थान टिकवुन धरले आहे.तर चीनने ( १९.५३ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – १४१.०९ कोटी,) निर्यात,रोजगारनिर्मिती व लष्कर/आर्थिक क्षमता…
संजय लांडगे,वाडा, महिलांना मिळणार रोजगार निर्मितीसाठी सहाय्य, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अपर्णा शिंगटे व आबिटघर ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आला होता.या जनजागृती शिबिराला महिला बचत गटाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर जनजागृती शिबिरामध्ये खादी ग्रामोद्योग पालघर जिल्हा नोडल ऑफिसर अरुण कुमार यादव यांनी महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी व त्यांना स्वयंपूर्ण बनवून आर्थिक साक्षर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाचे सुंदर विवेचन केले. तसेच असे विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून ग्रामपंचायत आबिटघरच्या सरपंच खऱ्या अर्थाने आपल्या सरपंच पदाचा गौरव वाढवत असल्याचा अभिमान वाटतो, असे उदगार,वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे यांनी…
आशिष देशपांडे,मुंबई नक्की खरं काय ? आणि खोटं कोण बोलतंय ? मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ९८ हजार कोटी रु.च्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवर शिंदे सरकारने डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन घाईघाईने खुलासा केला,पण तो मुंबईकरांना पटलेला नाही.या ठेवी आता ९ हजार कोटीवर आल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण,आरोग्य,उद्याने, धरणे,रस्ते,कोस्टल रोड,या सहा विकासकामांपैकी रस्ते व कोस्टल रोड,या दोन विकासकामांवर गेल्या तीन वर्षात प्रचंड खर्च करण्यात आला आहे.यामध्ये सत्ताधारी,अधिकारी व ठेकेदार यांचे उखळ चांगलेच पांढरे झाले आहे.ही जी लूट झाली आहे,ती प्रशासकीय…
बोईसर प्रतिनिधी, चुकून झाडलेल्या गोळीने साथीदाराचा बळी ; आठ जण अटकेत ,दोन जण फरार, पालघर तालुक्यातील बोरशेती जंगलात अवैध शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका शिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. २९ जाने.रोजी पहाटे, रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या टोळीतील एका सदस्याच्या बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीने रमेश वरठा (वय ६० रा. बोरशेती ) यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडुपांत लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र,पोलिसांच्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून,या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २८ जाने.रोजी आठ ते दहा जणांनी बोरशेती जंगलातील आंब्याच्या पाणी भागात रानडुकराच्या शिकारीचे नियोजन केले होते. शिकाऱ्यांनी बंदुका घेऊन डोंगराच्या कड्यावर आणि झाडांवर ठाण मांडले…
