” टग्या,”
फंटर लंख्येने अधिकाऱ्यांच्या काढल्या चड्ड्या,
बहुचर्चित वसई विरार शहर महानगरपालिकेची लक्तरे आता वेशीला टांगली गेली असून दररोज एकामागोमाग नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत.” खंडणी व वसुली,हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो तुम्हा करदात्यांच्या उरावर बसून मिळवणारच,” असे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोधवाक्य बनवले आहे.या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.एक वरीष्ठ अधिकारी
नामे अनिककुमार भवार व परेश कनाले या दोघांनी गेल्या तीन वर्षात महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली.
वसई विरार उपप्रदेशात या दोघांचे खंडणीखोर फंटर्स यांनी हैदोस घातला आहे.त्यांच्याच एका फंटरने दोन दिवसांपूर्वी हे एका ऑडिओ क्लिपने सिद्ध करून दाखवले आहे.रोहन लंख्ये या फंटरने आपले वरीष्ठ वसुलीच्या पैशासाठी कसा तगादा लावतात,हे या ऑडिओ क्लिपमधून समोर आणले आहे.कनाले सोबत ” कुठे,” या अधिकाऱ्याचे देखील उल्लेख केला.या ” कुठे,” नामे अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात किती माया जमवली,याची चौकशी झाल्यास आपल्यावर डोळे पांढरे व्हायची पाळी येईल.या सर्व घडामोडीनंतर आता या लंख्येला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्याच्या निलंबनाची प्रत काही दिली जात नाही.ही प्रत जर माध्यमांना दिली तर हा लंख्ये आपल्या सर्वांच्या चड्ड्या काढून आपल्याला नागडा करेल,अशी भिती या अधिकाऱ्यांना वाटत असावी,त्यामुळे ते त्याच्या निलंबनाची अधिकृत प्रत द्यायला धजावत नाहीत.वास्तविक या अधिकाऱ्यांनी अशाप्रकारची भिती बाळगण्याचे कारण नाही,कारण अगोदरच नागडे झालेल्यांच्या चड्ड्या हा लंख्ये कशा काढणार ? गेल्या अनेक वर्षांपासून या महानगरपालिकेत सर्वसामान्य करदात्यांच्या पैश्याची लूट सुरू आहे,हे काही लपून राहिलेले नाही.लोकप्रतिनिधी,
अधिकारी,ठेकेदार यांनी ” एकमेका साहाय्य करू,अवघे करू वसुली,” या उक्तीनुसार ही लूट चालवली आहे.
काल एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या लाईव्ह मुलाखतीमध्ये या वसुली प्रकरणी नवनिर्वाचित आमदारावर बेछूट आरोप केल्यामुळे करदात्यांना आश्चर्याचा धक्का बसला.बोईसर मतदारसंघाच्या वसई भागात वसुली कशी होते,या आमदारांचे फंटर्स थार व फ़ॉर्च्युनर गाड्यातून कसे फिरतात,याचे रसभरीत वर्णन केले.त्यामुळे सर्वांनीच या महानगरपालिकेचे लचके तोडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.
या महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांना ईडीच्या नोटीसा आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.पण राज्यातील एक राजकीय नेता,यासंदर्भात महत्वाची भूमिका निभावत आहे,त्यामुळे पुढील कारवाई काळ थंडावली आहे.काही नेते एकीकडे महानगरपालिकेच्या विविध विभागातील भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती मिळावी,यासाठी पत्रप्रपंच करत आहेत,तर दुसरीकडे त्यांचीही नांवे या प्रकरणात घेण्यात येत असल्यामुळे करदाते मात्र संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

