आशिष देशपांडे,मुंबई
नक्की खरं काय ? आणि खोटं कोण बोलतंय ?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ९८ हजार कोटी रु.च्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवर शिंदे सरकारने डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विरोधकांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन घाईघाईने खुलासा केला,पण तो मुंबईकरांना पटलेला नाही.या ठेवी आता ९ हजार कोटीवर आल्याचे स्पष्ट होत आहे.
शिक्षण,आरोग्य,उद्याने,
धरणे,रस्ते,कोस्टल रोड,या सहा विकासकामांपैकी रस्ते व कोस्टल रोड,या दोन विकासकामांवर गेल्या तीन वर्षात प्रचंड खर्च करण्यात आला आहे.यामध्ये सत्ताधारी,अधिकारी व ठेकेदार यांचे उखळ चांगलेच पांढरे झाले आहे.ही जी लूट झाली आहे,ती प्रशासकीय राजवटीच्या काळात,असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे.या आरोपामुळे गर्भगळीत झालेल्या एकनाथ शिंदे यांनी केलेला खुलासा हा तकलादू स्वरूपाचा ठरला आहे.ते आपल्या खुलाश्यात म्हणतात,या ठेवींना आम्ही हात लावला नाही,पण दुसरीकडे आम्ही रस्ते व कोस्टल रस्त्याची कामे केली,हे रस्ते प्रदूषण,खड्डे,पर्यावरण पूरक असे आहेत.पण त्यासाठी वापरण्यात आलेला निधी कुठून आणला,हे मात्र त्यांनी सांगितले नाही.त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यात बिलकुल तथ्य नाही,असे मुंबईकर करदात्यांना वाटते,त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी,अशी मागणी करत आहेत.

