अनिल वैद्य,नाशिक
विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट,
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला आज भेट दिली.यावेळी विद्यापीठाच्या कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,अ.वि.से.प., वि.से.प.यांच्या समवेत विद्यापीठाच्या ” ग्रीन कॅम्पसची,” पहाणी केली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यावेळी म्हणाल्या,विद्यापीठाचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने तो विलोभनीय झाला आहे.ग्रीन कॅम्पसमध्ये लावण्यात आलेली विविध प्रजातींच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राणी व पक्ष्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी आदर्श घ्यावा.
विद्यापीठातर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील तोरणे, विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या श्रीमती शिल्पा पवार,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्वाती कलाल महिला आयोगाच्या सह सचिव शालिनी रस्तोगी उपस्थित होते.

