संजय लांडगे,वाडा,
महिलांना मिळणार रोजगार निर्मितीसाठी सहाय्य,
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अपर्णा शिंगटे व आबिटघर ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आला होता.या जनजागृती शिबिराला महिला बचत गटाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सदर जनजागृती शिबिरामध्ये खादी ग्रामोद्योग पालघर जिल्हा नोडल ऑफिसर अरुण कुमार यादव यांनी महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी व त्यांना स्वयंपूर्ण बनवून आर्थिक साक्षर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाचे सुंदर विवेचन केले.
तसेच असे विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून ग्रामपंचायत आबिटघरच्या सरपंच खऱ्या अर्थाने आपल्या सरपंच पदाचा गौरव वाढवत असल्याचा अभिमान वाटतो, असे उदगार,वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे यांनी आपल्या भाषणात काढले.
आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णा शींगटे यांच्या संकल्पनेतून व साकार झालेल्या या कार्यक्रमामध्ये शेकडो महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.

