नवीन पाटील,सफाळे,
सफाळे पोलिसांकडून विद्यार्थ्याना कायदेविषयक मार्गदर्शन,
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियानातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुन्हे विषयक माहिती आणि त्यापासून सावधानता बाळगण्यासाठी सफाळे पोलीस ठाणे तर्फे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयात नुकतेच जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले.
जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त गाव अभियानांतर्गत सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना नुकतेच सायबर क्राईम,आर्थिक गुन्हयाचे प्रकार,अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणुक,ऑनलाईन नोकरी जाहिरात फसवणूक,ओएलएक्स फसवणूक लैंगिक फसवणूक केवायसी फसवणूक डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक याच्यापासून सावधनता कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर सायबर हेल्पलाईन क्र.१९३० वर संपर्क साधण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच स्पर्धा परीक्षा बाबतचे मार्गदर्शन आणि रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता विषयक वाहतुकीचे नियम याविषयी देखील मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली मार्गदर्शन शिबिरास हजाराहून अधिक विद्यार्थी हजर होते.

