- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; भाजप लागला कामाला.. इतर राजकीय पक्ष अद्याप निवांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत चालल्या असून येत्या २५ फेब्रु.रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रभाग आरक्षणसंदर्भात सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सहमती दाखवल्यामुळे निवडणूक घेण्याच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे.वरील तारखेला निकाल जरी लागला तरी या निवडणुका ऑक्टो.किंवा नोव्हे.महिन्यात होतील,असा अंदाज आहे.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर नागरिकाकडून हरकती/सूचना मागवणे व त्यावर निर्णय घेणे,इ.प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील.त्यानंतर मान्सून सुरू होईल,त्यामुळे या निवडणुका ऑक्टो.किंवा नोव्हें.दरम्यान होतील. महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची संख्या किती असावी,ही संख्या राज्य निवडणूक आयोगाने की राज्यसरकारने…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आता आत्मचिंतन करायला हवं, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या दोन पक्षातून आउटगोइंगला आता चांगलाच वेग आला आहे.भाजपच्या प्रभावासमोर गेल्या बारा वर्षात अनेक पक्षांची प्रचंड पडझड झाली.ज्या खासदार व आमदारांची हयात सेना व काँग्रेसमध्ये गेली,ते देखील भाजपच्या वळचणीला गेले,याचा पक्षाच्या धुरीणांनी विचार करायला हवा.मात्र आपली अशी अवस्था का झाली ? यामागची कारणे काय आहेत ? याविषयी या दोन्ही पक्षाचे नेते ते करायला तयार नाहीत.सत्तेच्या राजकारणात केवळ पहिल्या फळीला हाताशी धरून चालत नाही,तर बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी भाकरी फिरवावी लागते.ते न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची…
दीपक मोहिते, बुडाला आग, पवारांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार ; महाविकास आघाडीमध्ये ” मोडतोड तांबापितळ,” प्रक्रियेला वेग, काल शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केल्यामुळे शिवसेनेच्या ( उबाठा ) बुडाला चांगलीच आग लागली आहे.त्यांचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ” महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार,” देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शरद पवार यांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.या…
संगीता लहाने,पालघर पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, आज जिल्हा परिषद,पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत रोहिदास ( १२६७–१३३५ [ १ ] ) हे १५ व्या व १६ व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत होते.उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान,गुजरात, महाराष्ट्र,मध्य प्रदेश,पंजाब आणि हरियाणा या आधुनिक प्रदेशांमध्ये गुरू (अध्यात्मिक शिक्षक ) म्हणून ते पूजनीय, कवी,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.संत रोहिदास रोहिदास इ.स.१५ ते १६ व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी…
संजय लांडगे,वाडा, वाड्यात संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी, जगदगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांनी सामाजिक समता,श्रद्धा आणि कर्मयोगाचा संदेश दिला.त्यांच्या विचारांनी समाजात बंधुत्व आणि मानवतेचा संदेश पसरवला.या पवित्र दिनी समाजबांधवानी त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत रोहिदास महाराजांची जयंती ही त्यांच्या जीवनाचा, शिकवणींचा आणि वारशाचा उत्सव आहे.सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांबद्दलची त्यांची वचनबद्धता आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांची जयंती साजरी करताना,आपण त्यांच्या आदर्शांशी पुन्हा वचनबद्ध होऊ या आणि सर्वांसाठी अधिक न्याय आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी समाज बांधवानी काम करू, असे…
संदीप जाधव,बोईसर अज्ञात हिंस्त्र जनावराचा हल्ला; १४ बकऱ्या मृत्यूमु,परिसरात भितीचे वातावरण, पालघर – मनोर पूर्वेस काटाळे गावात अज्ञात हिंस्त्र प्राण्याने शेळ्याच्या गोठ्यात हल्ला करून १४ बकऱ्यांचा फडशा पाडला.काही बकऱ्यांचे मृतदेह बंदिस्त गोठ्याबाहेर ओढल्याच्या खुणा आढळल्या आहेत.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काटाळे गावी नदीच्या काठी किरण पाटील यांच्या शेतात बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी बकऱ्यांना चारापाणी देण्यासाठी गेले असता, गोठ्यात भीषण दृश्य दिसून आले.१४ बकऱ्या मृतावस्थेत सापडल्या होत्या,तर काही जखमी अवस्थेत तडफडत होत्या. यातील काही बकऱ्यांचे मृतदेह गोठ्याबाहेर ओढून नेल्याच्या खुणा आढळून आल्या, त्यामुळे हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता याचा…
संजय लांडगे,वाडा, गोऱ्हे येथील शाळेत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा संपन्न, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा सोमवारी (दि.१०) वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तृणधान्यांपासून निर्मित तसेच फॉर्टीफाईड तांदळापासून निर्मित पाककृतींचा समावेश करण्यात आला होता. या पाककला स्पर्धेत पोषण आहार शिजवणाऱ्या महिला तसेच माता पालकांनी सहभाग घेतला होता. केंद्रातील एकूण १५ शाळांनी सहभाग नोंदविला. पाक कला स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये चैताली खिलारे शाळा गोऱ्हे यांचा प्रथम क्रमांक आला. भक्ती पाटील शाळा खरिवली को. यांचा द्वितीय तर यशोदा आकरे शाळा भोपिवली यांचा तृतीय क्रमांक आला. विजयी स्पर्धक तसेच सहभागी सर्व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नौटंकी लक्षात न येण्याइतके वसईचे लोक दुधखुळे नाहीत…. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या अनेक मतदारसंघात दिग्गज उमेदवारांना पराभव चाखावा लागला.या पराभवाच्या मागची नेमकी कारणे काय आहेत ? याची उकल करण्यासाठी अनेक आमदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या परिवर्तनानंतर किती बदल झाला ? मतदारसंघातील विकासकामांना किती वेग आला ? व अन्य प्रश्नांची उत्तरे लवकर मागणे,हे न्यायाला धरून होणार नाही.कारण सुरुवातीचे दोन ते तीन महिने,हे ” नव्या नवरीच्या,नवलाईचे नऊ दिवस असतात,” ते त्यांना द्यावेच लागतात. हा दोन महिन्याचा काळ आता जवळपास संपत आला आहे.त्यामुळे परिवर्तनाच्या लाटेत…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे भारती विद्यापीठ शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न, जव्हार भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सांस्कृतिक कार्यक्रमात नारीशक्तीच्या दुर्दम्य ध्येयाला निश्चय वृत्तीला आणि त्यागाला सलाम करण्यासाठी ” तमसो मा ज्योतिर्गमय,” या प्रार्थनेच्या ओळींतून पूर्ण शाळेचा कार्यक्रमाचे स्वरूप तयार करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस नववीच्या विद्यार्थिनींनी भारती विद्यापीठ गीत म्हटले. तर सिनियर केजीच्या गार्गी गायकवाड या लहानशा विद्यार्थिनीने पाहुण्यांसाठी सुंदर स्वागत गीत सादर केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जव्हार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे,शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती जव्हारचे अधिकारी उपस्थित होते.भारती विद्यापीठ…
वसंत भोईर,वाडा, मिरचीचा तोरा उतरला,होऊ द्या झणझणीत… नवीन मिरचीचे उत्पादन निघताचा मिरचीचा भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे.कोणत्याही प्रकारची मिरची केवळ १५० रु.कि. दराने मिळत आहे. मिरचीचे भाव याहून खाली उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा राज्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.अर्ध्या अधिक देशात तेलंगणा राज्याचीच मिरची विक्री केली जाते. मागील वर्षी चांगल्या दर्जाच्या मिरचीचा भाव सुमारे २६० रु. कि.जोपर्यंत पोहोचला होता. मिरची खरेदी करण्यासाठी किमान ५०० रु.ची नोट घेऊनच जावे लागत होते.मिरची हा आहारातील अविभाज्य भाग बनला आहे. गेल्यावर्षी बेडगी- १५०- ३००- ४५० गरुडा-१००- २५० -३५० गुंटूर- १५० – २०० – २५० लवंगी- १८० – २१०- ३०० कोणत्या…
