संजय लांडगे,वाडा,
वाड्यात संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी,
जगदगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे अभिवादन करण्यात आले.
संत रोहिदास महाराज यांनी सामाजिक समता,श्रद्धा आणि कर्मयोगाचा संदेश दिला.त्यांच्या विचारांनी समाजात बंधुत्व आणि मानवतेचा संदेश पसरवला.या पवित्र दिनी समाजबांधवानी त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत रोहिदास महाराजांची जयंती ही त्यांच्या जीवनाचा, शिकवणींचा आणि वारशाचा उत्सव आहे.सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांबद्दलची त्यांची वचनबद्धता आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.
त्यांची जयंती साजरी करताना,आपण त्यांच्या आदर्शांशी पुन्हा वचनबद्ध होऊ या आणि सर्वांसाठी अधिक न्याय आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी समाज बांधवानी काम करू, असे आवाहन वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

