संगीता लहाने,पालघर
पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी,
आज जिल्हा परिषद,पालघर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत रोहिदास ( १२६७–१३३५ [ १ ] ) हे १५ व्या व १६ व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत होते.उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान,गुजरात, महाराष्ट्र,मध्य प्रदेश,पंजाब आणि हरियाणा या आधुनिक प्रदेशांमध्ये गुरू (अध्यात्मिक शिक्षक ) म्हणून ते पूजनीय, कवी,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.संत रोहिदास
रोहिदास इ.स.१५ ते १६ व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू ( शिक्षक ) म्हणून प्रभाव पडला आहे.ते कवी-संत,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.
अशा थोर महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली.
यावेळी प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी,प्रकल्प संचालक जल जीवन मिशन अतुल पारसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

