दीपक मोहिते,
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; भाजप लागला कामाला..
इतर राजकीय पक्ष अद्याप निवांत,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत चालल्या असून येत्या २५ फेब्रु.रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रभाग आरक्षणसंदर्भात सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सहमती दाखवल्यामुळे निवडणूक घेण्याच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे.वरील तारखेला निकाल जरी लागला तरी
या निवडणुका ऑक्टो.किंवा नोव्हे.महिन्यात होतील,असा अंदाज आहे.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर नागरिकाकडून हरकती/सूचना मागवणे व त्यावर निर्णय घेणे,इ.प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील.त्यानंतर मान्सून सुरू होईल,त्यामुळे या निवडणुका ऑक्टो.किंवा
नोव्हें.दरम्यान होतील.
महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची संख्या किती असावी,ही संख्या राज्य निवडणूक आयोगाने की राज्यसरकारने ठरवावी,प्रभाग रचना तसेच ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात की नाही,अशा विविध विषयांवर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
वरील सर्व प्रकरणी गेल्या तारखेस झालेल्या सूनावणीमध्ये याचिकाकर्ते,राज्यसरकार व निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सर्व मुद्दे एकत्रितपणे कायम करावेत,त्यामुळे पुढील तारखेला न्यायालयाला हा तिढा सोडवण्याविषयी निर्देश देता येईल,असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.त्याला सर्व वकिलांनी सहमती दाखवली होती. त्यामुळे २५ फेब्रु.रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये हा तिढा सुटू शकतो.या सर्व प्रकरणाचा निकाल लागला तरी निवडणुका घेण्या तीन ते चार महिन्याचा₹ कालावधी लागणार आहे.
त्यामुळे भाजप वगळता इतर सर्व पक्ष निवांत झाले
आहेत,भाजपने मात्र सदस्य नोंदणी,बूथ कमिटी,विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका, अन्य पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना पक्षात प्रवेश देणे व आपल्या मातृ₹ संघटना असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संबधित संघटनांना ( विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, हिंदू वाहिनी,) कामाला लावण्याचा धुमधडाका उडवून दिला आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामाला लागणाऱ्या पक्षांच्या तोंडाला या निवडणुकीतही भाजप फेस आणेल.

