वसंत भोईर,वाडा,
मिरचीचा तोरा उतरला,होऊ द्या झणझणीत…
नवीन मिरचीचे उत्पादन निघताचा मिरचीचा भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे.कोणत्याही प्रकारची मिरची केवळ १५० रु.कि. दराने मिळत आहे. मिरचीचे भाव याहून खाली उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तेलंगणा राज्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.अर्ध्या अधिक देशात तेलंगणा राज्याचीच मिरची विक्री केली जाते. मागील वर्षी चांगल्या दर्जाच्या मिरचीचा भाव सुमारे २६० रु. कि.जोपर्यंत पोहोचला होता. मिरची खरेदी करण्यासाठी किमान ५०० रु.ची नोट घेऊनच जावे लागत होते.मिरची हा आहारातील अविभाज्य भाग बनला आहे.

गेल्यावर्षी बेडगी- १५०- ३००- ४५०
गरुडा-१००- २५० -३५०
गुंटूर- १५० – २०० – २५०
लवंगी- १८० – २१०- ३००
कोणत्या मिरचीला मागणी
वाड्याच्या बाजारात प्रामुख्याने मालेवाडा,केसुरी, बुलेट,झिंगा,तेजा,आर मोर, शिव-५ या प्रकारच्या मिरचीला सर्वाधिक पसंती असते.सध्या सर्वच प्रकारची मिरची १५० रु.कि.दराने विकल्या जात आहेत.
मिरची विक्रेते आता थेट गावात जाऊन मिरचीची विक्री करीत आहेत.गावातही १५० रु.कि.दरानेच विक्री केली जात आहे. तेवढाच दर बाजारातही असल्याने नागरिक गावातच मिरचीची खरेदी करीत आहेत.
गेल्यावर्षी मिरची पिकाला चांगला भाव मिळाला होता.त्यामुळे तेलंगणा राज्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळले.परिणामी मिरची पिकाचे उत्पादन वाढले आहे.बाजारात मिरची पिकाची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत.कोणत्याही प्रकारची मिरची १५० रु.कि.दराने विकण्यात येत आहे.मिरचीची आवक वाढतच राहिल्यास पुन्हा भाव घट होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मिरची तोडणी आता सुरू आहे.
मिरचीचे उत्पादन जास्त झाले असल्याने ठोक दराने मिरची कमी भावात उपलब्ध होत आहे.मिरचीचे दर कमी झाले असले तरी पाहिजे तेवढी विक्री होत नाही.
– दिनेश नामदे,व्यापारी

