Author: दीपक मोहिते

अनिल वैद्य,नाशिक, ताणतणावाच्या वातावरणातही मुख्यमंत्री शिंदे निसर्गाच्या सानिध्यात रमले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाचे दर्शन आज नाशिककराना घडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिक येथे लाडकी बहीण मेळाव्याच्या निमित्ताने दौऱ्यावर आले होते.नाशिक जवळच असलेल्या ओझर विमानतळाजवळ असणाऱ्या वनराईमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराच्या हालचालीने त्यांचे लक्ष वेधले.आकाराने खूप मोठा असणारा मोर विमानतळाच्या कंपाऊंड लागत असलेल्या डीपीच्या बॉक्सवर बसला होता.या परिसरात मोर आणि अन्य वन्यजीवांचे मोठ्याप्रमाणावर वास्तव्य आहे.सतत राजकीय वातावरणात आणि ताणतणावात काम करत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष त्या मोरावर गेले.त्यांच्यातील निसर्गप्रेमी संवेदनशील माणूस जागृत झाला आणि त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या मोराचा…

Read More

प्रमोद डुंबरे,नालासोपारा, नालासोपारा पूर्व भागात एकाची हत्या तर अन्य तीन जण जखमी, तीन दिवसांपूर्वी एका मुलांवरून झालेल्या किरकोळ भांडणातुन आज तरुणाने तीन जणांवर हल्ला केला.यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या जखमीना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री नालासोपारा पूर्व भागातील कारगिल या परिसरात ही घटना घडली.किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन गट एकमेकांना भिडले,यावेळी रफिक,सलीम व त्यांच्या अन्य चार साथीदारांनी दिपू उर्फ दीपक पाल,आकाश पाल व शुभम ठाकूर या तिघांवर धारदार चाकूने हल्ला चढवला.या हल्ल्यात दिपू जागीच ठार झाला तर आकाश व शुभम ठाकूर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले.तर दुसऱ्या गटातील…

Read More

अनिरुद्ध सावंत,मुंबई, न्यूजलाईन, मविआचे राज्यात सर्वत्र मूक निदर्शने, महाराष्ट्र बंदला,न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षानी आज तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने केली.या निदर्शनामध्ये शिवसेना ( उबाठा ),राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,हे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष सहभागी झाले होते.तर दुसरीकडे भाजपने या निदर्शनाला काऊंटर करण्यासाठी प्रती आंदोलन केले.भाजपच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांनी नापसंती व्यक्त केली. महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या या मूक आंदोलनात शरद पवार,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,सुप्रिया सुळे,विजय वडेट्टीवार,नाना पटोले,संजय राऊत,अंबादास दानवे,सुषमा अंधारे,वर्षा गायकवाड व अन्य वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.भर पावसात हे आंदोलन पार पडले.या आंदोलनाला अपशकुन करण्यासाठी भाजपनेही काऊंटर आंदोलन छेडले.वास्तविक भाजपने छेडलेल्या या…

Read More

दीपक मोहिते, ” न्युजलाईन,” नियती ही नेहमी चांगल्याला साथ देत असते, ४७ वर्षांपुर्वीबरोबर आजच्या दिवशी, स्वातंत्र्यानंतर प्रथमच,काँग्रेस आणि इंदिरा गांधींचा अत्यंत दारूण पराभव झाला होता. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या आवारात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांना जनता पक्ष आणि आताच्या भाजपच्या तत्कालीन जनसंघाने एक घोषणा तयार केली होती ” काँग्रेसवाला दाखवा आणि शंभर रु.मिळवा,” त्यावेळी काँग्रेसजनांनी हा अपमान गिळला होता.त्यावेळी युवक काँग्रेस मात्र चांगलीच आक्रमक झाली होती. दिल्लीच्या मतमोजणीत काँग्रेसचे सारे उमेदवार भरपूर मागे पडले असतांना,बिकट स्थितीतही काँग्रेसचे युवक या घोषणेला आव्हान देत उभे होते, ” हां हां हम है काँग्रेसी, लाओ सौ रूपये,” अशी प्रतिघोषणा देण्याचे धाडस त्यांनी…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, शेतकऱ्यांच्या व्यथा, सोयाबीनच्या घसरत्या दराबाबत हस्तक्षेप करा ; किसान सभा, खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत.सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा ७९२ ते १ हजार ३९२ रु. प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा व आगामी काळात सोयाबीनला जास्त भाव मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा,अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा केली आहे. केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ रु प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता.मात्र शेतकऱ्यांना बाजारामध्ये सध्या ३ हजार ते ४ हजार…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महाराष्ट्र बंद ; न्यायालयाच्या निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित, मुंबई उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.भारतीय संविधानाचे अभ्यासक असलेल्या अनेक व्यक्तींनी न्यायालयाच्या या निर्णयासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले आहे.महाराष्ट्र बंद केल्यास कारवाई करा,असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत.अनेक घटनातज्ञानी हा निर्णय भारतीय संविधानातील कलम १९ चे उल्लंघन करणारे आहे,असे म्हंटले आहे. भारतीय संविधानातील कलम ( १९ ) (१) (c ) सरकारी निर्णयांना एकत्रितपणे आव्हान देण्यासाठी शांतता राखत एकत्र येण्याचा आंदोलन व निदर्शने करण्याचा मूलभूत अधिकार बहाल करते.तसेच या कलमान्वये सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करणे,सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात विरोधात सरकारला…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, विधानसभा रणसंग्राम-२०२४, २) १२९-विक्रमगड विधानसभा मतदारसंघ,अनु.ज. विक्रमगडवासीय सुनील भुसारा यांना पुन्हा संधी देतील का ? २६ जाने.२००२ रोजी विक्रमगड तालुक्याची निर्मिती झाली.हा तालुका जंगल व डोंगरदऱ्याने व्यापलेला असल्यामुळे गेल्या २३ वर्षात अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत.स्थानिक भूमीपुत्रांचे शेती हे रोजगाराचे एकमेव साधन आहे.दरवर्षी या तालुक्यात सरासरी २८०० ते ३००० मि.मी.पाऊस पडतो.या तालुक्यात एकूण ९४ महसूल गावे असून लोकसंख्या जवळपास १ लाख ५२ हजाराच्या आसपास आहे.भातशेती सोबत डोंगराळ भागात नागली व वरई इ.पिके घेण्यात येतात.पूर्वी हा तालुका कुडाण या नावाने ओळखले जात असे १० डिसें.१९४७ रोजी त्याचे विक्रमगड असे नामकरण करण्यात आले.तालुक्यात वारली,कुणबी,महादेव कोळी,ठाकूर,मल्हार कोळी,कातकरी व ढोरकोळी,अशा विविध…

Read More

सुनीता जोशी, मुंबई, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला न्यायालयाने परवानगी नाकारली, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे बंद झाल्यास कारवाई करण्याच्या नोटीसा पोलिसानी विरोधकांना बजावल्या आहेत. बदलापूर बलात्कार प्रकरणी सरकार,संबधित शाळा व्यवस्थापन व पोलीस यांच्या बेजबाबदारपणा विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून उद्धव ठाकरे यांनी विकृती विरुद्ध संस्कृती अशी ही लढाई असून या बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.दरम्यान महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारल्यानंतर आज ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर झालेल्या सूनावणीमध्ये न्यायालयाने बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे आदेश दिले आहेत.राजकीय…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांची दबक्या पावलाने महायुतीला धक्का देण्याची रणनिती, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी समाजाच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.ओबीसी नेत्यानी या निवडणुका लढवणार कि नाही,याविषयी अद्याप तोंड उघडलेले नाही.तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाजाच्या तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे.त्यांच्या उमेदवारांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले तरी त्यांचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभुत ठरू शकतात.उत्तर प्रदेशचे नेते दिवंगत कांशीराम यांचे निवडणुकीचे एक सूत्र होते.” पहिल्यांदा हरायचे,दुसऱ्यावेळी हरवायचे व तिसऱ्यावेळी जिंकायचे,” जरांगे यांनीही सध्या हेच सूत्र स्विकारले आहे.पण त्यांना जिंकायचे नाही,त्यांना सत्ताधाऱ्याना केवळ पाडण्यात रस आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच शहाणे व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी खोटे बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू केल्याचे पाहायला मिळतंय.बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर महायुतीचे हे दोन नेते पार बावचळून गेले आहेत.आपण काय बोलतो आहोत,याचे जराही भान न ठेवत ते धडधडीत खोटं बोलू लागले आहेत.विरोधकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा आधार घेत मतदारांची दिशाभूल केली,त्यामुळे आमचा पराभव झाल्याचे ते निकालानंतर ओरडून सांगत होते.वास्तविक २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी याच फेक नरेटिव्हचा बेमालूम वापर करत सत्ता मिळवली होती.ते हत्यार आता बुमरँगसारखे त्यांच्यावर उलटले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर त्यांच्या वागण्यात सुधारणा होईल,अशी…

Read More