सुनीता जोशी,
मुंबई,
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला न्यायालयाने परवानगी नाकारली,
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे बंद झाल्यास कारवाई करण्याच्या नोटीसा पोलिसानी विरोधकांना बजावल्या आहेत.
बदलापूर बलात्कार प्रकरणी सरकार,संबधित शाळा व्यवस्थापन व पोलीस यांच्या बेजबाबदारपणा विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून उद्धव ठाकरे यांनी विकृती विरुद्ध संस्कृती अशी ही लढाई असून या बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.दरम्यान महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारल्यानंतर आज ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर झालेल्या सूनावणीमध्ये न्यायालयाने बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे आदेश दिले आहेत.राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हाल बेकायदेशीर असून,शासनाने बंद पुकारणाऱ्या लोकांवर कारवाई करावी,असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.

