अनिरुद्ध सावंत,मुंबई,
न्यूजलाईन,
मविआचे राज्यात सर्वत्र मूक निदर्शने,
महाराष्ट्र बंदला,न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षानी आज तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने केली.या निदर्शनामध्ये शिवसेना ( उबाठा ),राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,हे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष सहभागी झाले होते.तर दुसरीकडे भाजपने या निदर्शनाला काऊंटर करण्यासाठी प्रती आंदोलन केले.भाजपच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांनी नापसंती व्यक्त केली.
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या या मूक आंदोलनात शरद पवार,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,सुप्रिया सुळे,विजय वडेट्टीवार,नाना पटोले,संजय राऊत,अंबादास दानवे,सुषमा अंधारे,वर्षा गायकवाड व अन्य वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.भर पावसात हे आंदोलन पार पडले.या आंदोलनाला अपशकुन करण्यासाठी भाजपनेही काऊंटर आंदोलन छेडले.वास्तविक भाजपने छेडलेल्या या आंदोलना बाबत अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बलात्कार सारख्या संवेदनशील प्रश्नावर राजकारण होता कामा नये,म्हणून भाजपने केलेल्या आंदोलनाचे समर्थन होऊ शकत नाही,अशा प्रतिक्रिया मुंबईत उमटल्या.

