प्रमोद डुंबरे,नालासोपारा,
नालासोपारा पूर्व भागात एकाची हत्या तर अन्य तीन जण जखमी,
तीन दिवसांपूर्वी एका मुलांवरून झालेल्या किरकोळ भांडणातुन आज तरुणाने तीन जणांवर हल्ला केला.यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या जखमीना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल रात्री नालासोपारा पूर्व भागातील कारगिल या परिसरात ही घटना घडली.किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन गट एकमेकांना भिडले,यावेळी रफिक,सलीम व त्यांच्या अन्य चार साथीदारांनी दिपू उर्फ दीपक पाल,आकाश पाल व शुभम ठाकूर या तिघांवर धारदार चाकूने हल्ला चढवला.या हल्ल्यात दिपू जागीच ठार झाला तर आकाश व शुभम ठाकूर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले.तर दुसऱ्या गटातील सलीम यांच्यावरही चाकूचे वार झाले आहेत,त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.ज्या परिसरात ही घटना घडली,तो परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो,येथे गेल्या काही वर्षात गुन्हेगारी जगतातील गुंडाचा मुक्त वावर असतो.या परिसरात पूर्वी पोलीस दर तीन महिन्यांनी कोंबिग ऑपरेशन राबवत असत, पण हल्ली ते होत नसल्यामुळे गुन्हेगारीचा ग्राफ सतत वाढत चालला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

