- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य अधोगतीच्या मार्गावर जात आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.राज्याचे गृह खाते सपशेल अपयशी ठरले असून पुण्यासारखे शहर आता गुंड टोळ्यांचे शहर झाले असून दररोज होणाऱ्या हत्या,कोयता गँगचा हैदोस व अमली पदार्थाचा व्यापार,अशा कारणामुळे पुणे शहर हे ” गुंडाचे शहर,” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याची जबाबदारी पेलता आली नाही,त्यामुळे विरोधकाकडून त्यांच्यावर सतत टीकेचा भडिमार होत आहे.बदलापूर बलात्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे,प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.सर्वसामान्य आरोपींना २४ तासात हुडकून काढणारे पोलीस,शाळेचे संस्थाचालक,मुख्याध्यापिका व शिल्पकार जयदीप आपटे,याना शोधू शकत नाहीत.गेल्या पंधरा…
दीपक मोहिते, त्यामुळे भाजपचे ” मिशन लोटस,” थंडावले… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले रेशीमबाग सध्या चिंताग्रस्त झाले आहे.महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता येईल,असे संघाच्या धुरीणांना वाटत नाही.त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला तो केवळ अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे झाला,असे संघाचे ठाम मत झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ६५ ते ७० जागा मिळतील,असा संघाचा अंदाज आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलापूर बलात्कार व मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे.या दोन घटनांमुळे महायुती सरकारविरोधात निर्माण झालेले वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरेल,असे संघाला वाटतं.त्यामुळे भाजप,शिंदे व अजित पवार या तिन्ही गटांनी एकत्र निवडणूक…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांची झोप उडवली, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी व त्यांचे विश्वासू सहकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप व अजित पवार गटातील आमदारांना तसेच जिल्ह्यातील नेत्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसापूर्वी शाहू घराण्याचे वारस व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांची झोप उडवून दिली आहे.घाटगे यांच्या प्रवेशावेळी झालेली सभा ही न भूतो,न भविष्यती,अशी भव्य दिव्य स्वरूपाची होती.त्या सभेला झालेली कागलवासीयांची गर्दी पाहून हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.समरजीत घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील…
दीपक मोहिते, भाजप,पालघर विधानसभेसाठीही आग्रही, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नालासोपारा,विक्रमगड व डहाणू भाजपला तर वसई,पालघर व बोईसर शिंदे गटाला समसमान जागा,असे सूत्र ठरले असताना भाजप पालघरसाठी आता आग्रही आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य घेतले होते.त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला दोनच जागा देऊ पाहत आहे.त्यांच्या सर्व्हेनुसार पालघर विधानसभा शिंदे गटाला जिंकता येणे शक्य नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी,असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वापार बालेकिल्ला असून केवळ २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता येथे झालेल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जम्मू – काश्मीर निवडणूक ; जगाचे लक्ष लागले आहे, जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा येत्या १८ सप्टें.रोजी पार पडणार आहे.या विधानसभेच्या एकूण ९० जागासाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.तर ४ ऑक्टो.रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे अनुक्रमे २५ सप्टें.व १ ऑक्टो.रोजी होणार आहे.या निवडणुकीत सुमारे ८७ लाख ९० हजार मतदार आपला हक्क बजावतील.या विधानसभेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षानंतर होत आहेत.सध्या या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे.या राज्याच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते,त्यानंतर आयोगाने या राज्यासह हरयाणा राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…
दीपक मोहिते, एसटी कामगारांचा संप ; आगारे ओस पडली,लोकांचे अतोनात हाल, ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर राज्यातील ८० हजार एसटी कामगारांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.आठ दिवसापूर्वी एसटी कामगारांचा संप होणार असल्याचे जाहीर होऊनही राज्य सरकारने कोणतीही हालचाल केली नाही.त्यामुळे गणपतीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज अतोनात हाल झाले. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या एसटी संपाला चिथावणी देणाऱ्या महायुतीच्या नेत्यावर एकप्रकारे काळाने सूड उगवला आहे.या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे आज अतोनात हाल झाले.आजच्या या संपामुळे राज्यातील ८० % एसटी आगारे ओस पडली असून एकूण ८० हजार कामगारापैकी ६७ हजार कामगार या संपात सामील झाले आहेत.गुणरत्ने सदावर्ते यांची एकमेव संघटना वगळता अन्य सर्व…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” २०२९ साली ” एक देश,एक निवडणूक,” संकल्पना अस्तित्वात येण्याची शक्यता ? ” एक देश,एक निवडणूक,” हा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे.गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आपल्या भाषणात ” एकत्रित निवडणुका,” घेण्याचा आपला मनोदय व्यक्त केला.त्यामुळे २०२९ च्या निवडणुका या एकत्रित निवडणूक पद्धतीने होतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी निवडून येण्यापूर्वी २०१३ साली अशी मागणी केली होती.वेगवेगळ्या निवडणुका घेण्यात होणारा प्रचंड खर्च व विकसकामामध्ये निर्माण होणारे अडथळे व संसाधनांचा अपव्यय,अशी तीन महत्वाची कारणे,त्यांच्या या मागणीमागे होती. त्यांच्या या मागणीनंतर या विषयावर अनेक समित्या नेमण्यात आल्या,पण त्यातून काहीही निष्पन्न…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” आपला दवाखाना,” व ” शासन आपल्या दारी,” दोन्ही उपक्रम शासनकर्त्यांच्या विस्मरणात, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर तीन इंजिनच्या सरकारने गेल्या तीन महिन्यात राज्याच्या विकासासाठी हजारो कोटी रु.आणल्याचे जाहीर केले.पण हा निधी जातो कुठे ? त्या निधीचा वापर कोणत्या विकासकामांवर होतो,याचा थांगपत्ताही लागत नाही.जाहीर केलेला निधी हा नक्की राज्य सरकारला मिळतो कि या फक्त तोंडाच्या वाफा असतात. आज पण शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून १४ हजार कोटी रु.तर डिजिटल प्रकल्पासाठी २० हजार ८१७ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे वृत्त आताच प्रसिद्ध झाले आहे.हा निधी केवळ रस्तेबांधणी ( या कामात टक्केवारी मिळते ) व इन्व्हेंट ( यामध्ये सरकारची बिघडलेली प्रतिमा…
दीपक मोहिते, पापाचा घडा भरणार, शिखर बँक आर्थिक घोटाळा ; अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे.एकीकडे अनेक सहकारी पक्ष सोडून शरद पवार गटात सामील होत आहेत,दुसरीकडे भाजपमध्ये अजित पवार गटाची ” संगत नको रे बाबा,” असा सूर आळवणारा एक मोठा गट सक्रिय झाला आहे.त्यामुळे अजित पवार यांची स्थिती ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनाक्रम लक्षात घेता,” नियती कधीच कोणाला सोडत नाही,” असेच खरं म्हणावे लागेल. शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रु.घोटाळ्याच्या प्रकरणाने आता पुन्हा डोकं वर काढले आहे. शिखर बँक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तुतारी,घड्याळाची टिक,टिक बंद करणार का ? अजित पवार गटाच्या घडाळ्याची टिक टिक तुतारीच्या गगनभेदी आवाजामुळे बंद होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अजित पवार गटातील अनेकजण भिंतीवरील घड्याळ दूर सारून त्याच्या जागी तुतारी लटकवण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातील अनेक आमदार व पदाधिकारी महायुतीत आपल्यावर होणाऱ्या टीकेमुळे नाराज असून त्यांना शरद पवार यांची साथ सोडल्याचा आता पश्चाताप होऊ लागला आहे.समरजीत घाटगे हे भाजपचे व तर अन्य काही पदाधिकारी अजित पवार गटाचा त्याग करून शरद पवार गटात सामील झाले आहेत.आता ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील अंतर्गत धुसफुसीला कंटाळले असून लवकरच ते तुतारी हाती घेण्याच्या…
