- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
वाडा प्रतिनिधी, आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांची गळफास घेऊन आत्महत्या, वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे. देविदास परशुराम नवले – १५ व मनोज सिताराम वड – १४,अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते बिवळपाडा व दापटी ता.मोखाडा येथे राहणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे.येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ४५० विद्यार्थी निवासी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदिवासी पालघर जिल्ह्याची ओळख वेगाने बदलत चालली आहे, सरकार दरबारी पालघर जिल्ह्याची ओळख ” आदिवासी जिल्हा,” अशी असली तरी आता त्यामध्ये झपाट्याने बदल होत असून हा जिल्हा आता ” प्रकल्पग्रस्त जिल्हा,” म्हणून ओळखू लागला आहे.केंद्र व राज्य सरकार,एका मागून एक असे अनेक विनाशकारी प्रकल्प या जिल्ह्यावर लादू पाहत आहे.या जिल्ह्याला लाभलेला निसर्गरम्य समुद्र व पूर्व भागातील विपुल वनसंपदा जिल्ह्याच्या मुळावर आले आहे. १९८० – ९० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची या जिल्ह्यावर विशेष करून वसई तालुक्यावर वक्रदृष्टी पडली व जिल्ह्याच्या वाताहतीला सुरुवात झाली.वाढवण व अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व २,वाढवण काँग्रेस व…
सचिन सावंत,वसई वसई शिवसेनेचे ( उबाठा ) तहसीलदाराना निवेदन, वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) शिष्टमंडळाने काल वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.तहसीलदाराना भेटण्यास गेलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी केले. तहसीलदाराना देण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनात राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी शासनाकडून सतत होणारी चालढकल,अवकाळी पाऊस,गारपीटी,हमीभाव,शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनामध्ये झालेली वाढ,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणे व पीक विमा योजनेच्या जाचक अटी शिथिल करणे,इ.मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे व पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
दीपक मोहिते, नागपूर येथे ” मराठाभुषण,” पुरस्कार सोहळा थाटात संपन्न, अखिल भारतीय मराठा महासंघाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने नागपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ,नागपूर येथे नुकतेच मराठाभूषण पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार वितरण सोहोळ्यात समाज व अन्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा ” मराठाभूषण,” पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप,राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे,राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, प्रदेश महिला अध्यक्षा वंदना रोटकर,प्रदेश युवा सचिव गौरव होणे,राम मुळ्ये, अकोला,पालघर,कोल्हापूर,व महाराष्ट्रातील इ.मान्यवर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक,उद्योजक,क्रीडा, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या तेरा…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” महानगरपलिका निवडणुका मार्च – एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता… महानगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांचे भवि्तव्य इव्हीएम मशिन्सच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. दरम्यान निवडणूक आयोग इतर राज्यातील इव्हीएम मशिन्स आणून निवडणूक जाने. महिन्यात होऊ शकतात का ? याविषयी पडताळणी करत आहे.मात्र या पर्यायाला राज्यातून विरोध होण्याची शक्यता आहे.तसेच आयोगाने हा पर्याय स्विकारला तर प्रकरण न्यायालयात जाईल व निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडतील,असे निवडणूक विषयक तज्ञाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणुका जाने.अखेरपर्यंत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असला तरी ‘ईव्हीएम,’ च्या उपलब्धतेवरच ते शक्य होणार आहे. महापालिकांसाठी वेळेत ‘ईव्हीएम,’ उपलब्ध न झाल्यास महापालिकांच्या निवडणुका या…
वाडा प्रतिनिधी, श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन, तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या प्रश्नांवर आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी ‘ कोण म्हणतो देणार नाय;घेतल्याशिवाय राहणार नाय,’अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील निराधार महिलांना के.वाय.सी. करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच सरसकट योजनांचा लाभ देण्यात यावा,अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना अमृत आहार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असुन या महिलांसाठी तत्काळ आहार उपलब्ध करून देण्यात यावा, तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये परिचारिका निवासी राहणे आवश्यक आहे मात्र निवासी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होते निवासी राहत नसलेल्या डाॅक्टर व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात…
वाडा प्रतिनिधी, वाडा नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर,ख़ुशी कम,जादा गम, वाडा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभागृहात वाड्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व ५० टक्के महिला आरक्षणाची सोडत चीट्ठीच्या माध्यमातून काढण्यात आली.यावेळी प्रभाग क्रमांक -१,२,८,११ हे प्रभाग अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून यापैकी प्रभाग क्रमांक-२ व ८ हे अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित झाले आहेत.तर प्रभाग क्रमांक-१४ हा प्रभाग अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक-३,७,११,१३,१६ व १७ हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक -३,७,१७ हे प्रभाग महिला…
वाडा प्रतिनिधी, कुडूस येथे अज्ञात इसमांकडून शिक्षकाला बेदम मारहाण, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रमोद थालके यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून लाठी काठ्या सळईने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात थालके हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सदर घटना काल सायं.६.०० च्या सुमारास डोंगस्ते गावच्या हद्दीत घडली.या हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवघर जिल्हा परिषद शाळेत प्रमोद थालके हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेतआज सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना डोंगस्ते गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी अडवून त्याच्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी लाठ्या काठ्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे, नगरसेवक हा नेमका कसा असावा ? आपल्या नगरसेवकाबाबत आपल्या अपेक्षा कशा असायला हव्यात ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत ? निवडणुकीविषयी जागृत असणे,हे आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते,ती आपण पार पाडली तरच परिसराचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. नगरसेवक,या शब्दाची व्याख्या कशी आहे ? ते आपण जाणून घ्यायला हवे.नगरसेवक हा लोकसेवक असतो,आणि त्याला जाब विचारणे,हे आपले प्रथम कर्तव्य असते. नगरसेवक आपल्याच परिसरातील प्रभागात राहणारा असावा,तसा तो असल्यास,त्याला त्या भागातील अडचणी व समस्याची जाणीव असू शकते. नगरसेवकपदाची निवडणूक लढवणारा उमेदवार हा लोकांच्या अडचणी व सुखः दुःखात सहभागी होणारा असावा.स्वतःची…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यथा,ही केवळ नौटंकीच ठरेल… रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वसई तालुक्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे,साऱ्या राजकीय पक्षांना नागरिकांची घोर चिंता लागली आहे.त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे आम्हा वसई – विरारकर नागरिकांचा उर अक्षरशः भरून आला आहे.सत्ताधारी पक्ष आपल्याच सत्तेविरुद्ध आंदोलन करू शकत नाही,त्यामुळे ही मंडळी सध्या रील बनवण्यात मग्न आहेत.तर दुसरीकडे काँग्रेसचा पर्यावरणवादी नेता चार ते पाच कार्यकर्त्याना सोबत घेऊन अधून मधून रास्ता रोको करत असतो.प्रशासनातील अधिकारी देखील अशा आंदोलनाकडे ” पावसाळ्यातील बेडूक,” या उद्देशाने पाहत असतात.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय पक्ष जागे झाले आहेत,हे न समजण्याइतके वसईकर नागरिक नक्कीच दुधखुळे…
