Author: दीपक मोहिते

शुभम सावंत, विरार विरार येथे धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान संपन्न, महाराष्ट्रभुषण डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या सौजन्याने आज सकाळी ८.३० वा.वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य शहरे व आसपासच्या गावातील मुख्य रस्त्यांवर, अंतर्गत रस्ते,बाजारपेठा, सरकारी कार्यालये,सरकारी दवाखाने,पोलीस ठाणे परिसर, एसटी स्टँड व रेल्वेस्थानका बाहेरचे परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. ” स्वच्छ भारत अभियानाचे,” राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष ” पद्मश्री,” ने सन्मानित डाॅ.आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व डाॅ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा हे एक सेवादायी समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे.या भव्य स्वच्छता अभियानामध्ये एकूण ४ हजार ३२७ श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने…

Read More

वसंत भोईर,वाडा सिंचन विहीर योजनेमुळे पाण्याचा प्रश्न मिटला, पालघर जिल्हातील विविध आदिवासी बहुल भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळ असताना वाडा तालुक्यातील गोराड – वडपाडा व वसई तालुक्यातील थळ्याचापाडा या गावामध्ये प्रसाद चिकित्सा,गणेशपुरी यांच्या प्रयत्नामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.काही महिन्यापूर्वी दुष्काळाचे चटके सोसणारे आणि पाण्यासाठी वणवण भटकंती करणारे ही गावे विहीर उपलब्ध झाल्यामुळे सध्या सुखावले आहेत. प्रसाद चिकित्सा संस्था गावकऱ्यांनी केलेले सहकार्य त्यातून हे यश मिळाले आहे.या गावामध्ये मार्च महिन्यानंतर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असे.त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्थेने विहिरीसाठी जागा शोधल्या व नवीन विहीरी बांधून दिल्या.त्यामुळे लोकांना आता भरपूर प्रमाणात पाणी मिळू लागले आहे.त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती…

Read More

संजय लांडगे,वाडा डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वाड्यात स्वच्छ्ता मोहीम, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण,आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत कार्य केले.त्यांचा जन्म १ मार्च रोजी झाला.त्यांचा वाढदिवशी स्वच्छता अभियान राबवण्यात येते.त्यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज वाडा शहरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत तालुक्यातील एक हजार स्वच्छता दूत सहभागी झाले होते. वाड्यातील खंडेश्वरीनाका येथे सकाळी आठ वाजता घमेली, झाडू,खराटा,नगरपंचायतच्या कचरा गाड्या व १२ ट्रॅकटर घेऊन सर्व स्वच्छ्ता दूत एकत्र जमले होते.गटागटाने शहरभर पसरून स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते.वाड्यातील प्रत्येक नगरात जाऊन गल्ली व रस्ते झाडण्यात आले. याप्रसंगी…

Read More

दिपक मोहिते ” नियतीच श्रेष्ठ,” अवैधरित्या पैसा कमावणाऱ्याची गत अशीच होत असते, वसई तालुक्यातील जमिनी लुटणाऱ्या व बांधकाम व्यवसायातुन पैसा कमवून गडगंज श्रीमंत झालेल्या राकेश वाधवान यांच्यासाठी पायघड्या घालणारे आता त्याच्या ओस पडलेल्या प्रसादाकडे फिरकेनासे झाले आहेत.केवळ वाधवानच नाही तर त्यांच्या मुलांनाही जेलची हवा खावी लागली.एकेकाळी आलिशान गाडीतून फिरणारा इतराना कर्जपुरवठा करणारा सफेदपोश माणूस सध्या हलाखीचे आयुष्य जगत आहे.नियती कोणाला सोडत नाही,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सहाराचे सर्वेसर्वा सूब्रत रॉय याचीही अशीच अवस्था झाली होती.त्याचा शेवट कसा झाला हे सर्वश्रुत आहे.नियती कधीच कोणाला सोडत नाही.गोरगरिबांची अशा लोकांना हाय लागते. इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला अशी असंख्य उदाहरणे पाहायला मिळतील. या…

Read More

दीपक मोहिते, ” भयानक वास्तव,” झोपडपट्टी पुनर्वसन योजना,प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारी, दोन दिवसांपूर्वी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी वसई तालुक्याचा काळाकुट्ट चेहरा समोर आणला आहे.एकेकाळी येथील वाढती अनधिकृत बांधकामे व झोपडपट्ट्यामुळे या परिसराला ” मिनी धारावी,” असे म्हंटलं जायचं,आज तोच परिसर ” बिग धारावी,” म्हणून नावारूपाला आला आहे.प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात २ लाख ३२ हजार १४२ झोपडपट्ट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यापैकी १ लाख २० हजार झोपडपट्ट्या पेल्हार प्रभाग समिती क्षेत्रात आहेत.येथे झालेली अनधिकृत बांधकामे व उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्या यास महानगरपालिकेचे अधिकारी,राजकीय नेते,समाजकंटक व माध्यमांचे लोक,यांची साखळी जबाबदार आहे.याच पेल्हार भागातील अनधिकृत बांधकामामधून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या…

Read More

नाशिक प्रतिनिधी, नाशिकच्या मोगली कॅफेवर आ.देवयानी फरांदे यांचा छापा, नाशिकमध्ये कॅफेचे जाळे पसरत चालले असून या कॅफेंमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या.याविषयी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आ.देवयानी फरांदे यांनी नाशिकच्या मध्यवर्ती भागात गंगापूर रोड येथे सुरू असलेल्या मोगली कॅफे येथे स्वतः धाड टाकून दिवसाढवळ्या सुरू असणारे अनैतिक व अश्लील कृत्य करणाऱ्या युवक युवतींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याविषयी माहिती देताना आ.देवयानी फरांदे म्हणाल्या, नाशिक शहराचा एक सांस्कृतिक वारसा असून जाणीवपूर्वक नाशिकचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कॅफे सुरु झाले असून…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा – खुपरी येथे यु.एस.फार्मा कंपनीचे गोदाम आगीत भस्मसात, तालुक्यातील खुपरी येथे असलेल्या यु.एस.फार्मा या कंपनीच्या गोदामाला आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास आग लागली. ही आग एवढी भयानक होती की धुराच्या लोट पाहून लोकांची एकच पळापळ झाली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या घटनास्थळी धाव घेऊन जवानांनी आग आटोक्यात आणली.तोपर्यंत कंपनीचे लाखो रु. चे साहित्य जळून भस्मसात झाले.ही आग कंपनीच्या बाहेर रानावरील गवत पेटून लागलेल्या वणव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खुपरी गावाच्या हद्दीत यु.एस.फार्मा,ही औषधे तयार करणारी कंपनी आहे.या कंपनीचे गोदाम औषधे, गोळ्या व इतर साहित्याने पूर्णपणे भरलेले होते.वाडा नगरपंचायत व विरार येथील अग्निशामक दलाच्या…

Read More

जव्हार प्रतिनिधी, वडोली ग्रामपंचायत क्षेत्रातील ६० विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे वाटप. ” अंधाराकडून प्रकाशाकडे,” या प्रकल्पाच्या माध्यमातून वडोली ग्रामपंचायत हद्दीतील ६० विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शासकीय आश्रमशाळा,देहेरे येथील विद्यार्थी शिवम याने प्रेरित केलेल्या या उपक्रमाचा भव्य कार्यक्रम आज ग्रामपंचायत वडोली येथे पार पडला. या कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अमेरिकेतील ” काइंडनेस ग्रोस हिअर,” या स्वयंसेवी संस्थेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेला प्रकाश मिळावा,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. आ.हरिश्चंद्र भोये यांचा सरपंच कामिनी गावंढा आणि…

Read More

दीपक मोहिते, उष्णतेत प्रचंड वाढ : राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उन्हात बचाव व्हावा,यासाठी संबंधित विभागाने उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक माहिती जाहीर आहे.मार्च ते मे या तीन महिन्यात राज्यात उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने खालील गोष्टींची काळजी घ्यावी,असे आवाहन केले आहे. काय करावे – तहान लागली नसली,तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स,छत्री/टोपी,बूट व चपल यांचा वापर करावा, प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी,छत्री किंवा रूमालाचा वापर करावा,तसेच ओल्या कपड्याने डोके,मान व चेहरा झाकून घ्यावा, शरीरातील…

Read More

संजय लांडगे,वाडा ट्रक मागून धडकल्यामुळे दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक जखमी, वाडा तालुक्यातील सोनाळे व कळंभे गावादरम्यान काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून कामानिमित्त सोनाळ्याहून काळभ्यांच्या दिशेने जात असताना येथील वळणावर एका ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.या घटनेत दुचाकी वर बसलेल्या दोघांपैकी एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे करण घाटाळ ( वय२१ ) असे नांव आहे.तर अरुण शरद वाघ ( वय२१ ) हा गंभीर जखमी जखमी झाला असून त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे दोघे सोनाळे (खुर्द) गावठाण येथील…

Read More