दीपक मोहिते,
उष्णतेत प्रचंड वाढ : राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी,
राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उन्हात बचाव व्हावा,यासाठी संबंधित विभागाने उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक माहिती जाहीर आहे.मार्च ते मे या तीन महिन्यात राज्यात उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने खालील गोष्टींची काळजी घ्यावी,असे आवाहन केले आहे.
काय करावे –
तहान लागली नसली,तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे,
हलके,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत,
बाहेर जाताना गॉगल्स,छत्री/टोपी,बूट व चपल यांचा वापर करावा,
प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी,
उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी,छत्री किंवा रूमालाचा वापर करावा,तसेच ओल्या कपड्याने डोके,मान व चेहरा झाकून घ्यावा,
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस,घरी बनवण्यात आलेली लस्सी,लिंबूपाणी, ताक,इ.पेयांचा नियमित वापर करावा,
अशक्तपणा,डोकेदुखी, स्थूलपणा,सतत येणारा घाम इ. कारणे ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. अशावेळी चक्कर आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
गुरांना छावणीत ठेवावे,तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे,
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर,गवत व सनशेडचा वापर करण्यात यावा,
रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात,
पंखे,ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा,तसेच वेळोवेळी अंघोळ करावी,
कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,
सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊ नये,
पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करून दिवसा सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा,
बाहेर काम करत असताना नियमित ब्रेक घेवून आराम करावा,
गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी,
तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराचे दार व खिडक्या उघड्या ठेवाव्यात,
काय करू नये –
लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वा पार्क केलेल्या गाडीत ठेवू नये,
•दुपारी १२:०० ते ३:३० च्या सुमारास बाहेर जाणे टाळावे,
गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे,
तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे दुपारी १२ ते ३:३० च्या सुमारास टाळावीत,
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे,
उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये,
यात्रा आयोजित करणाऱ्या समितीने काय करावे,
यात्रेत ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,
यात्रेच्या ठिकाणी एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन ठेवण्यात यावी,
यात्रेमध्ये उन्हाचा त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकिय मदत उपलब्ध करुन द्यावी,
दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा सावलीत लावाव्यात,
उन्हाचा आघात झालेल्या व्यक्तीची माहिती तात्काळ जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ कळविण्यात यावी,

