संजय लांडगे,वाडा
डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वाड्यात स्वच्छ्ता मोहीम,
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण,आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत कार्य केले.त्यांचा जन्म १ मार्च रोजी झाला.त्यांचा वाढदिवशी स्वच्छता अभियान राबवण्यात येते.त्यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज वाडा शहरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत तालुक्यातील एक हजार स्वच्छता दूत सहभागी झाले होते.
वाड्यातील खंडेश्वरीनाका येथे सकाळी आठ वाजता घमेली, झाडू,खराटा,नगरपंचायतच्या कचरा गाड्या व १२ ट्रॅकटर घेऊन सर्व स्वच्छ्ता दूत एकत्र जमले होते.गटागटाने शहरभर पसरून स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते.वाड्यातील प्रत्येक नगरात जाऊन गल्ली व रस्ते झाडण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे,दिवाणी व फौजदारी न्यायालय,वाडाचे न्या.रितेश निकम,वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश, एस.टी.चे कर्मचारी,नायब तहसीलदार व प्रांत कार्यालयाचे अधिकारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

