संजय लांडगे,वाडा
ट्रक मागून धडकल्यामुळे दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक जखमी,
वाडा तालुक्यातील सोनाळे व कळंभे गावादरम्यान काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून कामानिमित्त सोनाळ्याहून काळभ्यांच्या दिशेने जात असताना येथील वळणावर एका ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.या घटनेत दुचाकी वर बसलेल्या दोघांपैकी एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे
करण घाटाळ ( वय२१ ) असे नांव आहे.तर अरुण शरद वाघ ( वय२१ ) हा गंभीर जखमी जखमी झाला असून त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे दोघे सोनाळे (खुर्द) गावठाण येथील रहिवासी आहेत.ट्रक चालक ट्रक ओसामा अली शेर खान ( वय२० ) याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या तब्यात दिले आहे.अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

