वसंत भोईर,वाडा
वाडा – खुपरी येथे यु.एस.फार्मा कंपनीचे गोदाम आगीत भस्मसात,
तालुक्यातील खुपरी येथे असलेल्या यु.एस.फार्मा या कंपनीच्या गोदामाला आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास आग लागली. ही आग एवढी भयानक होती की धुराच्या लोट पाहून लोकांची एकच पळापळ झाली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या घटनास्थळी धाव घेऊन जवानांनी आग आटोक्यात आणली.तोपर्यंत कंपनीचे लाखो रु. चे साहित्य जळून भस्मसात झाले.ही आग कंपनीच्या बाहेर रानावरील गवत पेटून लागलेल्या वणव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खुपरी गावाच्या हद्दीत यु.एस.फार्मा,ही औषधे तयार करणारी कंपनी आहे.या कंपनीचे गोदाम औषधे, गोळ्या व इतर साहित्याने पूर्णपणे भरलेले होते.वाडा नगरपंचायत व विरार येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे अथक प्रयत्न केले, मात्र गोदाम जळून खाक झाले. मात्र कंपनी वाचली,याप्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

