Author: दीपक मोहिते

संजय लांडगे,वाडा भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश, भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम ईगल इंट्रोडक्शन या कंपनीला दिले असून,सदर कंपनीने रस्त्याच्या एका बाजूचे संपूर्ण खोदकाम केले आहे. मात्र,हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून,संपूर्ण मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे.यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात खा.डॉ.हेमंत सवरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर पालघर विभाग पोपट चव्हाण,प्रोजेक्ट मॅनेजर दीपक पवार व ठेकेदार यांना तातडीने वाड्यातील निवासस्थानी बोलावून घेऊन रस्त्याच्या सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्ग सुस्थितीत करणे, रस्त्यावरील मोठ्या…

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई ग्रामस्थांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच, तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी बुधवार(दि.५) पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी ही सुरूच आहे. या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.साहित्य खरेदी करताना अवास्तव रकमांचे अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” समान नागरी कायदा ; केंद्र सरकारची सावध भूमिका, बहुचर्चित समान नागरी कायद्याच्या ( युसीसी ) प्रस्तावाला उत्तराखंड राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकार तो देशभरात लागू करण्यासंदर्भात हालचाल करेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण सुमारे चार महिन्याचा काळ लोटल्यानंतरही केंद्रीय स्तरावर फारशा हालचाली होऊ शकल्या नाहीत.हा कायदा लागू केल्यास देशभरात त्याचे कसे पडसाद उमटतील याविषयी केंद्र सरकार साशंक आहे.त्यामुळे या अतिसंवेदनशील विषयी सरकार सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी झालेल्या १८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यांच्या जाहीरनाम्यात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्याचे धोरणात्मक मार्गदर्शक तत्व…

Read More

दीपक मोहिते, राज्याच्या शहरी भागात दरडोई उत्पन्न वाढले, नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक पाहणीत आपल्या राज्याचे दरडोई उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रु.इतके झाले आहे.तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे १ लाख ८८ हजार ८९२ रु.आहे.मात्र ज्या शहराचे दरडोई उत्पन्न वाढले आहे,तेथे दरडोई खर्चात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात एकूण ३६ जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धरण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्र दरडोई उत्पन्न दाखवण्यात आले आहे.अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील १२ जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या…

Read More

वसंत भोईर, वाडा ग्रामपंचायत खानिवलीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड, ग्रामपंचायत खानिवलीच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात येत असुन महिलांच्या रोजगार,व्यावसायिक प्रशिक्षणे,आरोग्य तपासणी,शिक्षण या विषयांवर भर देण्यात येत आहे.रोजगार हमीच्या कामांवर महिलांना १०० % प्राधान्य देण्यात आले आहे.अनेक व्यवसायभिमुख प्रशिक्षणे महिलांना देण्यात आली आहेत.या सर्वांचा एकत्रित परिणाम की केंद्र शासनाच्या पंचायत विकास निर्देशांकमध्ये देशातील साडे सातशे ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत.या मध्ये ग्रामपंचायत खानिवली ची निवड झाली असुन पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. महाराष्ट्रातील ३४ ग्रामपंचायती या महिला स्नेही ग्रामपंचायती म्हणून निवडण्यात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये…

Read More

सुरेश काटे,तलासरी वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच, अपघाताचे प्रमाण वाढले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपुल,सेवा रस्ते इ. कामे काम शिल्लक आहेत.महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी सध्या काँक्रीटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा इ. कारणामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ कि.मी.लांबीचा महामार्ग येतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.या अपघातामध्ये ५७…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा – चिंचघर शाळेतील महिलांचा सन्मान, तालुक्यातील चिंचघर येथील ह. वी.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत भोईर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. यावेळी भोईर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाची ज्योत पेटवणाऱ्या तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा चालवत आहात.त्यामुळे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या कार्याला सलाम असल्याचे सांगून सर्व महिलांबरोबर मनमोकळा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका पूनम भोईर व चेतना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी आज तुमचा सन्मान होत असताना काळाची गरज लक्षात घेऊन जबाबदारी…

Read More

शुभम सावंत,विरार जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा पालिकेतर्फे सन्मान, महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन, महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि त्यांच्या जीवनात नवी पहाट उगवली.समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग असावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ” जागतिक महिला दिन,” साजरा केला जातो. महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करुन समाजप्रबोधन घडवण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत…

Read More

सुशील भोईर,वसई हिरकणी कक्षाचे आज जागतिक महिला दिनी उदघाटन, वसई तहसीलदार कार्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हिरकणी कक्षाचे उदघाटन करण्यात आले. तहसीलदार,प्रांत,कोर्ट, पंचायत समिती कार्यालय असून महिला मोठ्या प्रमाणात शासकीय कामानिमित्ताने येत असतात.परंतु लहान मुलांना घेऊन आलेल्या स्ननदा मातांना बाळाला दुध पाजण्यासाठी आडोसा शोधावा लागतो.महिलांची ही अडचण लोकशाही महिला संघटनेच्या लक्षात आली.महिला संघटनेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वसई तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांच्याकडे या विषयी सतत पाठपुरावा करत होते.अनेक आंदोलन व मोर्चे सुध्दा या विषयावर काढण्यात आले.अखेर लोकशाही महिला संघटनेच्या लढ्याला यश मिळाले.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काही शासकीय कामानिमित्ताने आलेल्या गायत्री अनंता ठाकरे व त्यांचे बाळ शिवमई वय १३…

Read More

संजय लांडगे,वाडा वाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा, चैतन्य संस्था प्रेरीत सुयोदय ग्रामीण महिला संघ शिवणसई यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील अंबरभुई ( भोवरे पाडा ) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनासंबंधी ग्रामीण महिलांना व बचत गटाच्या महिलांना जिल्हा देखरेख आधिकारी राजश्री तरसे यांनी मार्गदर्शन करुन आजच्या दिवसाचे महत्व सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच महिलांसाठी चैतन्य संस्था कशी कार्यरत आहे, याविषयी माहिती देवून संस्था महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अर्थसहाय्य करते यावर सविस्तर विवेचन केले.तसेच आपल्या मुलांना शिक्षण देवून मोठे करा,असे आवाहन केले.त्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम होवून, बचत गट अध्यक्ष,सचिव, सदस्य यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात…

Read More