वसंत भोईर,वाडा
अंभई ग्रामस्थांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच,
तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह सहनिर्देशनास आणूनही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी बुधवार(दि.५) पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी ही सुरूच आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.साहित्य खरेदी करताना अवास्तव रकमांचे अनावश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा,छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे,असे विविध आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली.परंतु जोपर्यंत कारवाईला सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार,
– नरेश पाटील, उपोषणकतेॅ
.

