वसंत भोईर,वाडा
वाडा – चिंचघर शाळेतील महिलांचा सन्मान,
तालुक्यातील चिंचघर येथील ह. वी.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत भोईर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
यावेळी भोईर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाची ज्योत पेटवणाऱ्या तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा चालवत आहात.त्यामुळे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या कार्याला सलाम असल्याचे सांगून सर्व महिलांबरोबर मनमोकळा संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका पूनम भोईर व चेतना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी आज तुमचा सन्मान होत असताना काळाची गरज लक्षात घेऊन जबाबदारी देखील वाढली असल्याचे सांगितले.यावेळी संस्था सहसचिव गणेश तरे व संचालक सुनील पाटील हे उपस्थित होते.

